मुंबई -मुंबईत अनेक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत इमारत दुर्घटना झाल्याचे वृत्त समोर येत असते. आज (10 जून २०२1) रोजी मालाड मालवणी परिसरात असलेली दोन मजली इमारत कोसळली असून, यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाच प्रकारे मुंबईत दरवर्षी अनेक इमारत दुर्घटना घडत आहेत.
- 10 जून 2021 -
मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर रात्रीच्या सुमारास मालाड मालवणी परिसरात दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत.
- 21 सप्टेंबर 2020 -
भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत 39 जणांचा मृत्यू झाला होता. भिवंडीमधील पटेल कंपाऊडमध्ये ही घटना घडली होती. जिलानी नावाची ही इमारत होती.
- 25 ऑगस्ट 2020 -
महाड येथील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. त्यात निष्पाप १६ जणांचे बळी गेले होते. तर ९ जण गंभीर जखमी झाले. बांधकाम निकृष्ट असल्याने अवघ्या ९ वर्षांत ही इमारत कोसळली. त्यामुळे संबंधित बिल्डर्ससह अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
- 31 ऑगस्ट 2017 -