मुंबई -सुभाष कुमार यांच्या जागी अल्का मित्तल यांची ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Alka Mittal Head For ONGC) याबाबत 3 जानेवारीला कंपनीने अधिकृत घोषणा केली. या (Alka Mittal first Woman Head For ONGC) नियुक्तीमुळे, मित्तल या ओएनजीसीच्या इतिहासात पूर्णवेळ संचालकपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. दरम्यान, ही नियुक्ती सहा महिने किंवा या पदासाठी नियमित नियुक्ती जाहीर होईपर्यंत असेल अस कंपनीने यामध्ये म्हटले आहे.
कुमार देखील डिसेंबरच्या अखेरीस निवृत्त झाले
31 मार्च 2021 रोजी शशी शंकर प्रमुख या पदावरून निवृत्त झाल्यापासून (ONGC)कडे पूर्णवेळ (Oil and Natural Gas Company) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नव्हेत. सामान्यतः, पदावर असलेल्या व्यक्तीच्या निवृत्तीच्या किमान काही महिने आधी भावी प्रमुखाची निवड होते. परंतु, यावेळी शंकर यांच्या निवृत्तीनंतर, तत्कालीन ज्येष्ठ संचालकांकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. माजी संचालक सुभाष कुमार(वित्त विभाग) यांच्याकडे ( 1 एप्रिल 2021)ला या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. परंतु, कुमार देखील डिसेंबरच्या अखेरीस निवृत्त झाले, त्यामुळे हे पद काही दिवस रिक्त होते. त्यावर आता मित्तल यांची निवड झाली आहे.
3 जानेवारीला आदेश जारी करण्यात आला
मित्तल या सध्या संचालक मंडळातील सर्वात वरिष्ठ आहेत. हीच बाब लक्षात घेऊन त्यांना सीएमडीचे पद दिले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. (Director Entrusted With Additional Charge of ONGC CMD) मात्र, वेगळा काही निर्णय होतो का अशीही शंका व्यक्त केली जात होती. परंतु, मित्तल यांच्याकडेच हा पदभार देण्यात आला. त्याबाबतचा औपचारिक आदेश 3 जानेवारीला जारी करण्यात आला.
समीतीला योग्य उमेदवार आढळला नाही
निवड मंडळाकडे,( PSU)प्रमुख पदासाठी 10 अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर मे-जून 2021 दरम्यान, यासंबधी मुलाखती झाल्या. मात्र, यामध्ये निवड समीतीला योग्य उमेदवार आढळला नाही. त्यानंतर काही नावांशी शिफारस करण्यात आली.