मुंबई -अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) क्वारंटाईनचे (Quarantine) नियम मोडून दिल्लीला गेली आहे. त्यामुळे ती परत मुंबईत आल्यावर तिला क्वारंटाईन करून पालिका (BMC) तिच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने करण जोहरने त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीनंतर अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर आणि सीमा खान यांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्टीत आलिया भट्ट देखील सामील होती.
- आलिया भट्टवर कारवाईची शक्यता -
पार्टीनंतर आलिया भट्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता. पण, तिला क्वारंटाईन होण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे. आलिया बॉलिवूड दिग्दर्शक आर्यन मुखर्जीसोबत दिल्लीत गुरूद्वारमध्ये दर्शनासाठी गेली होती.
- दिल्लीतील गुरुद्वारामध्ये दर्शन घेण्यासाठी गेली होती आलिया
दरम्यान, यावेळी तिने तिच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. आलिया भट्ट चार्टर विमानाने आज दिल्लीहून मुंबईला परतणार आहे. आलिया मुंबईत येताच महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आलियावर कारवाई करण्याची शक्यता आहे.