मुंबई- संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून गरीब नागरिकांना फायदाच होणार आहे. श्रीमंत वर्गावर करांचा बोजा पडेल, मात्र आयात-निर्यात क्षेत्रात हा अर्थसंकल्प फायदेशीर असल्याचे मत आयात-निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ अजित व्होरा यांना व्यक्त केले.
गरीबांसह आयात-निर्यात क्षेत्राला लाभदायक अर्थसंकल्प - अजित व्होरा - संसद
या अर्थसंकल्पातून गरीब नागरिकांना फायदाच होणार आहे. श्रीमंत वर्गावर करांचा बोजा पडेल, असे मत अजित व्होरा यांनी व्यक्त केले. मात्र आयात निर्यात क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प लाभदायक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
![गरीबांसह आयात-निर्यात क्षेत्राला लाभदायक अर्थसंकल्प - अजित व्होरा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3755279-thumbnail-3x2-budget.jpg)
शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत कोणत्याच सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली नव्हती. मात्र या अर्थसंकल्पात चांगला निर्णय घेतला आहे. आयात-निर्यात क्षेत्रात या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन घेऊन ते इतर देशांना निर्यात करता येणार आहे. हा या अर्थसंकल्पातील चांगला निर्णय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अर्थसंकल्पातून सगळ्याच क्षेत्रात चांगली तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.