महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shikhar Bank Scam Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणात चौकशीला मी तयार - अजित पवार

महाराष्ट्र राज्य कॉपरेटिव्ह शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू करण्यासाठी युडब्लूने अर्ज केला आहे. मी चौकशीला तयार (inquiry in Shikhar Bank scam case) आहे. असे अजित दादा पवार यांनी म्हटले (Ajit Pawar ready for inquiry) आहे.

By

Published : Oct 18, 2022, 1:10 PM IST

Updated : Oct 18, 2022, 1:47 PM IST

Ajit Pawar
अजित पवार

मुंबई :महाराष्ट्र राज्य कॉपरेटिव्ह शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू करण्यासाठी युडब्लूने अर्ज केला आहे. या प्रकरणावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे की -माझी कुठलीही चौकशी करा. मी चौकशीला तयार (inquiry in Shikhar Bank scam case) आहे. तसेच तपास यंत्रणेला सहकार्य देखील करेल, असे अजित पवार यांनी म्हटले (Ajit Pawar ready for inquiry) आहे.

क्लीन चीट नंतर पुन्हा चौकशी :शिखर बँक घोटाळा प्रकरणात गेल्या अनेकदा अनेक तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात आली होती. या तपासणीत क्लीन चीट देखील देण्यात आली आहे. जर या प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरवले असेल, तर त्याला माझा कुठलाही विरोध नाही. कोणती चौकशी करायची हा सर्वस्व अधिकार राज्य सरकारचा आहे. मात्र मला या संदर्भात काहीही चौकशीकरीता विचारण्यात आले, तर मी चौकशीला सहकार्य करेल. असे अजित पवार यांनी म्हटले (Ajit Pawar ready for inquiry) आहे.

परतीच्या पावसामुळे नुकसान भरपाई :महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह रहिवाशांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरपाई तातडीने मिळवण्याकरिता राज्य सरकारने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने सर्वे करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी देखील मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे करणार (Ajit Pawar statement) आहे.



अजून शेतकऱ्यांना मदत नाही :मागील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान राज्य सरकारने लवकरात लवकर देण्याची घोषणा केली होती. मात्र दिवाळीच्या तोंडावर देखील अद्यापही मागील अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कुठलीही मदत मिळालेली नाही. या संदर्भात देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून दिवाळीच्यापूर्वी या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी करणार आहे. असे अजित पवार यांनी म्हटले (Ajit Pawar statment on Shikhar Bank scam probe) आहे.


सर्वसामान्यांची दखल घ्या :दिवाळी एक आठवड्यावर येऊन पोहोचली असताना राज्य सरकारने सर्वसामान्य लोकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानांमध्ये शंभर रुपयांमध्ये दिवाळीला फराळाकरता लागणारे वस्तू देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती. यासंदर्भात टेंडर देखील देण्यात आले आहे. मात्र अद्यापही स्वस्त धान्य दुकानांमध्ये या संदर्भातील साहित्य पोहोचलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी लवकरात लवकर गोड करण्याचा दृष्टिकोनातून राज्य सरकारने विचार करावा, असे देखील अजित पवार यांनी म्हटले (Shikhar Bank Scam Case) आहे.

Last Updated : Oct 18, 2022, 1:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details