महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Pawar on Ambadas Danve, अंबादास दानवेंची निवड स्वीकारली; अजित पवार स्पष्टच बोलले - Ajit Pawar scolded colleagues party

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची निवड ( ambadas danve as opposition leader in legislative council ) झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी ( congress, NCP displeasure on Ambadas Danve ) व्यक्त केली जात होती; मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar on Ambadas Danves sellection ) यांनी सेनेच्या अंबादास दानवे यांची निवड आम्ही स्वीकारली ( Ambadas Danve get accepted as opposition leader in legislative council ) असून त्यावर वाद करायची गरज नाही, असे स्पष्टीकरण आज दिले. अजित पवार ( Ajit Pawar scolded colleagues party ) यांनी यावरून सहकारी पक्षाचे कान टोचले.

Ajit Pawar on Ambadas Danves sellection
अंबादास दानवेंची निवड स्वीकारली अजित पवार यांची प्रतिक्रिया

By

Published : Aug 11, 2022, 6:29 PM IST

मुंबई : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची निवड ( ambadas danve as opposition leader in legislative council ) झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी ( congress, NCP displeasure on Ambadas Danve ) व्यक्त केली जात होती; मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar on Ambadas Danves sellection ) यांनी सेनेच्या अंबादास दानवे यांची निवड आम्ही स्वीकारली ( Ambadas Danve get accepted as opposition leader in legislative council ) असून त्यावर वाद करायची गरज नाही, असे स्पष्टीकरण आज दिले. विधानभवनात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. मंत्री पदावरून शिंदे गटात आणि भाजपात धुसफूस सुरू असताना महाविकास आघाडीतील विधान परिषदेच्या जागेवरून अंतर्गत मतभेद समोर आले होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परिषदेच्या जागेबाबत आम्हाला विचारात घेतले नाही, अशी खंत व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी देखील हे सूर लावले. विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar scolded colleagues party ) यांनी यावरून सहकारी पक्षाचे कान टोचले.


१६ ऑगस्टला रणनीती ठरवणार -आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. २६ आणि २७ तारखेला ही बैठक घ्या अशी आम्ही मागणी केली. हे सरकार आल्यानंतर बराच वेळ गेला आहे. आमचे सरकार गेल्या नंतर कुणाला काय वाटत या बद्दल चर्चा झाली. जमीन, पीक, रस्त्यांचे नुकसान झाले आहे. कायदा सुव्यवस्थावर आम्हाला चर्चा करायची आहे. कामकाज कमी दिवसाचे असल्यामुळे लक्षवेधीला वेळ दिला जाईल. बरेच दिवस सर्व प्रमुख गटनेतेची आमची बैठक झाली. १६ ला अंतिम रणनीती ठरवणार आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.


खातेवाटप रखडले - आम्ही पंतप्रधानांनासुद्धा याबद्दल भेटून मागणी केली होती. पंतप्रधानांनी सुद्धा मान्य केले होते. बरेच दिवस भेट झाली नव्हती. त्यांच्या मनात काय आहे. स्थानिक निवडणूक आणि सध्या जी सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे त्याबाबद्दल आणि इतर बरेच विषयावर चर्चा झाली. खाते वाटप का रखडले, अजून माहीत नाही. कदाचित दिल्लीवरून ग्रीन सिग्नल नसावा. आता एका मंत्र्याकडे दोन पालकमंत्री पद असेल, अशी टीका पवार यांनी केली.


फडणवीस बिनखात्याचे मंत्री -देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता, उपमुख्यमंत्री असताना पुणेचे पालक मंत्री झालो होतो. आता कदाचित उपमुख्यमंत्री पण पुणेचे पालकमंत्री होतील, असे अजित पवार यांनी सांगितले. नागपूरची उपराजधानी सोडून पुण्याचे पालक मंत्री होत आहेत. पुण्याचे सुपुत्र म्हणून मी त्यांचा स्वागत करतो. आता मंत्री होऊन पण बिन खात्याचे आहेत. आपण नकारात्मक विचार नको करू, या सकारात्मक विचार करू या असे आवाहन पवार यांनी केले.


विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी दानवे -विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांची वर्णी लागल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद कुणाकडे याकडे लाक्ष लागले होते. अखेर शिवसेनेचे आंबादास दानवे यांची निवड व्हावी असे पत्रच सभापतींना देण्यात आल्याने अनेकांची अडचण झाली. मात्र, यावर अधिकचे राजकारण न होता या निवडीला सहमती दर्शविण्यात आली आहे. असे असातानाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आपली नाराजी लपवून ठेऊ शकलेले नाहीत.


राष्ट्रवादींच्या नेत्यांचे म्हणणे काय?
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी म्हणजे कायमची आघाडी नाही असे म्हणत फुटीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शिवया महाविकास आघाडीमध्ये सर्वच काही सुरळीत आहे असेही नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी आम्हाला विश्वासात न घेतल्याची खंत व्यक्त केली तर दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र, निवडीला सहमती असल्याचे सांगत हे प्रकरण वाढवू न देता मिटवण्याची भूमिका घेतलेली आहे.

हेही वाचा -नायजेरियन युवकाला कुठलाही गुन्हा नसताना दीड वर्ष तुरुंगवास, नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details