मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावरुन भाजपने शिवसेना-राष्ट्रवादीला लक्ष्य केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. परराज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे, उद्योग-धंदे पळवायला आले, असा अर्थ कसा काढला जातो, असा सवाल अजित पवार यांनी भाजपला विचारला.
एसटी कर्मचारी संप, सरसकट शाळा सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar on ST Strike ) यांनी मत मांडले. राज्याच्या कोरोना विषाणुच्या नव्या नियमावलीबाबत केंद्राने केलेल्या सूचनांबाबत सुधारणा केल्याचे जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेसची बैठक सुरू; 'या' विषयावर होणार चर्चा
सोयी-सुविधांच्या ठिकाणी उद्योग जातात
भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील उद्योग धंदे पळवण्यासाठी ( Ashish Shelar on Mamata Mumbai visit ) ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्याचा आरोप केला. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, इतर राज्यातील मुख्यमंत्री येतात. ते आपले उद्योग-धंदे पळवायला आले असा अर्थ कसा निघेल ? उदयोगपती हे त्यांना आवश्यक पाणी, रस्ता, वीज यासारख्या पायाभूत सुविधा असतील तिथे जाण्याचा प्रयत्न करतात. काहीजण यासाठी रेड कार्पेट टाकतात. काहीजण अतिरिक्त सवलत देतात. मोठे उद्योग आणण्यासाठी यापूर्वीही असे निर्णय झाले आहेत. राज्याचे प्रमुख व उद्योग विभागाला निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा-Vidarbha State : वेगळ्या विदर्भाचा प्रस्तावच केंद्र सरकार समोर नसल्याचं म्हणणं अत्यंत चुकीचे - श्रीहरी अणे
सगळ्यांना नियम समान हवेत
केंद्राच्या आणि राज्यात नियमावलीत थोडी तफावत होती. त्या नियमावलीनुसार त्यात बदल केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. इतर राज्यातून येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. बाहेरून राज्यात आलेले काही पेशंट पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी. परंतु, नवीन विषाणू अतिशय वेगाने परसत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काहींच्या मते लक्षणे सौम्य आहेत. खबरदारी म्हणून नियम असायला हवेत. केंद्राने नव्या शिफारसी सुचविल्या तर त्यात कराव्या लागतील. सगळ्यांना नियम सारखे हवेत. अन्यथा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी ( Maharashtra deputy CM on corona guidelines ) म्हटले आहे.
हेही वाचा-Winter Session 2021 : सलग दुसऱ्या वर्षी नागपूर करार मोडला, जाणून घ्या... नागपूर कराराबद्दल !
मुलांचे आरोग्य महत्त्वाचे-
अजित पवार ( Ajit Pawar on schools reopening in Maharashtra ) म्हणाले, की राज्यात शाळांसाठी एकच नियम असावा. जेव्हा १ डिसेंबरापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी हा नवीन विषाणू आला नव्हता. मात्र आता नवीन विषाणूचा धोका निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत आमचे बोलणे झाले आहे. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. मुलांचेही यात अतोनात नुकसान झाले आहे. परंतु, मुलांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे वर्षा गायकवाड यांना सांगितल्याचे पवार म्हणाले.
सामोपचाराने प्रश्न सोडवा -
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले, की राज्य सरकारने एसटीचा संप कुठेही तुटेपर्यत ताणलेला नाही. संपाबाबतची भूमिका परिवहन मंत्री अनिल परब मांडत आहेत. कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा मुद्दा ते सातत्याने मांडत आहेत. सरकारने आता भूमिका जाहीर केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेली पगारवाढ दिली आहे. जोपर्यंत त्रिसदस्यीय समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत थांबावे लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. काहींनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे फेऱ्या सुरू झाल्या आहेत. सगळ्यानी सामोपचाराने प्रश्न मिटवून घ्यायला हवे, असे उपमुख्यमंत्री पवार ( MH deputy CM advice to ST employees ) यांनी स्पष्ट केले.
आता चर्चा करणे योग्य नाही-
राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी चतुर्वेदी यांची मुख्य सचिवपदी निवड केली आहे. कुंटेना मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. तीन राज्यातून मुदतवाढीचा प्रस्ताव गेला होता. दोन राज्यांच्या मुख्य सचिवांना मुदत वाढ दिली. परंतु, कुंटे यांना मुदतवाढ दिलेली नाही. मात्र, मुदत संपल्यावर त्यांची सल्लागार पदी निवड केली आहे. राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना यापूर्वी असे अनेक निर्णय घेतले होते. मुंबई पोलीस आयुक्तांना ही मुदतवाढ देण्यात आली होती. आता असे का झाले, कशामुळे मुदतावाढ दिली नाही, यावर चर्चा करणे उचित नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.