महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अजित पवारांनी हरिभाऊ बागडेंना फोन केला अन् म्हणाले... - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बातमी

आमदारकीचा राजीनामा देताना अजित पवार माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फॉरमॅटमध्ये राजीनामा आला असल्याने तो स्वीकारला, असे बागडे यांनी सांगितले.

हरिभाऊ बागडे

By

Published : Sep 27, 2019, 8:49 PM IST

Updated : Sep 27, 2019, 11:55 PM IST

मुंबई -माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी बोलून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, अशी माहिती बागडे यांनी दिली.

अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत माहिती देताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

हेही वाचा -शरद पवार यांच्या मागे ईडी चौकशी कोणी लावली? नांदगावकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

अजित पवार यांनी आपला राजीनामा बागडे यांच्या मुंबई येथील कार्यालयात ईमेलद्वारे पाठविला होता. हा राजीनामा देताना अजित पवार माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फॉरमॅटमध्ये राजीनामा आला असल्याने तो स्वीकारला, असे बागडे यांनी सांगितले.

हेही वाचा -ईडी प्रकरण : न्यायालयाच्या आदेशानेच गुन्हे दाखल - रावसाहेब दानवे

विधानसभेची मुदत संपायला आली असून विधानसभेच्या निवडणुकीची आचार संहिता लागलेली आहे. त्यामुळे पवार यांच्या राजीनाम्याने सरकार विरोधी रोष व्यक्त गेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Last Updated : Sep 27, 2019, 11:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details