मुंबई -केंद्र सरकारने कसा अर्थसंकल्प सादर करावा हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. केंद्र सरकारचा बजेट सादर झाल्यानंतर देशभरातील राज्य आपला अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ( Ajit Pawar on Union budget ) दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवीन आर्थिक वर्षाकरिता राज्य सरकार 11 मार्चला अर्थसंकल्प ( MH budget on 11th March ) सादर करणार आहे. त्याबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, की महाराष्ट्र सरकार आपले बजेट मांडेल. कोरोनामुळे आलेल्या अडचणीतून अजूनही राज्य सरकार ( Ajit Pawar on MH economy ) सावरलेले नाही. राज्याच्या आर्थिक उत्पन्नाचा अंदाज घेतला गेला होता. त्याप्रमाणे अद्यापही राज्याला आर्थिक उत्पन्न आलेले नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील आपण चर्चा करणार ( MH finanace Minister on Budget ) आहोत. केंद्र सरकारचा बजेट पाहून राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटली, १३८४ नव्या रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू