महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Pawar : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड - विरोधी पक्षनेते अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांची महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते ( Leader of Opposition Ajit Pawar ) म्हणुन निवड करण्यात आली आहे. या संर्भात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. तो विधानसभेने मंजूर केला आहे.

Ajit Pawar elected Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

By

Published : Jul 4, 2022, 4:49 PM IST

Updated : Jul 4, 2022, 5:28 PM IST

मुंबई- राष्ट्रवादीचे अजित पवार ( Ajit Pawar ) यांची महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते ( Leader of Opposition Ajit Pawar ) म्हणुन निवड करण्यात आली आहे. या संर्भात राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी प्रस्ताव मांडला. तो विधानसभेने मंजूर केला आहे. काल मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात (Yashwantrao Chavan Center) राष्ट्रवादीची बैठक झाली होती. त्यावेळी अजित पवार (ajit pawar) यांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे आज त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये (mahavikas aaghadi government) अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. तसेच त्याच्याकडे अर्थमंत्रीपद देखील होते. आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीला ९९ मते पडली. त्यामुळे गेली दहा दिवसांहून अधिक चाललेली सत्तानाट्य हे संपुष्टात आले आहे.

हेही वाचा -Sharad Pawar on Elections : सरकार सहा महिन्यांत कोसळेल; मध्यवर्ती निवडणुकीला तयार रहा - शरद पवार

विधानसभेच्या पहिल्या विशेष अधिवेशनाच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेवर मात केली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष ( Rahul Narwekar Assembly Speaker ) झाले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार हे बहुमताला सामोरे गेले. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे शेवटच्या मिनिटाला पोहोचले-दरवाजे बंद झाल्याने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, झिशान सिद्धीकी, धिरज देशमुख या आमदारांना सभागृहात जाता आले नाही. त्यामुळे तब्बल सहा नेत्यांना उशीर झाल्यामुळे मतदान करता आले नाही. उशीर झाल्यामुळे आदित्य ठाकरेही बालंबाल बचावले - एकीकडे काँग्रेसह इतर पक्षांच्या नेत्यांना मतदान करण्यासाठी सभागृहात जाता आले नाही. अनेक नेते अगदी शेवटच्या मिनीटाला सभागृहात पोहोचले. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे देखील सभागृह बंद होण्याच्या शेवटच्या मिनीटाला पोहोचले. त्यामुळे आदित्य ठाकरे हे देखील मतदानापासून वंचित राहिले असते.

हेही वाचा -उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा झटका, विधानसभा अध्यक्ष विरोधी याचिकेवर 11 जुलै रोजी निर्णय

Last Updated : Jul 4, 2022, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details