महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

..तर माझे मामा जेलमध्ये असते का? अजित पवार यांचे प्रत्युत्तर - emergency

काँग्रेसने १९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांची संख्या किती? त्यांपैकी सध्या हयात किती? यासोबतच किती जणांना दरमहा ५ हजार आणि कितींना १० हजार रुपये पेन्शन दिली जाते?

..तर माझे मामा जेलमधे असते का

By

Published : Jun 25, 2019, 4:11 PM IST

Updated : Jun 25, 2019, 5:18 PM IST

मुंबई - आणीबाणीत शिवसेनेने कॉंग्रेसला मदत केली, अजित पवारांच्या सरकारनचे माझ्या वडीलांना जेलमधे टाकले होते, असा आरोप आमदार बदामराव पंडित यांनी विधानसभेत केले होते. त्यांना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आणीबाणीत मी १६ वर्षाचा होतो आणि माझे मामा एनडी पाटील जेलमधे होते. आमचे सरकार असते तर माझे मामा जेलमध्ये असते का? असा सवाल करत विधानसभेत खसखस पिकवली.

कांग्रेसने १९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांची संख्या किती? त्यांपैकी सध्या हयात किती? यासोबतच किती जणांना दरमहा ५ हजार आणि कितींना १० हजार रुपये पेन्शन दिली जाते? याचा सरकारी तिजोरीवर दरमहा आर्थिक भार किती पडतो? याबाबतची माहिती सरकारकडे उपलब्ध आहे का? असा तारांकीत प्रश्न अजित पवारांनी विधानसभेत उपस्थित केला होता. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना अॅफीड्युटवर पेन्शन देण्याच्या निर्णयावर फेरविचार करा, अशी मागणी अजित पवारांनी विधानसभेत केली होती.

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मिसा आणि डीआयआर अंतर्गत ३ हजार २६४ लोकांना पेन्शन मंजूर केले. ११७९ जणांना अॅफीडीव्हीट घेऊन पेन्शन दिली. ६५ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. त्यासाठी जिल्हा पातळीवर समिती गठित केली होती.
पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष करा, अशी मागणी पराग अळवणी यांनी केली.
आणीबाणीत शिवसेनेने कॉंग्रेसला मदत केली, अजित पवारांच्या सरकारने माझ्या वडीलांना जेलमधे टाकले होते, असा आरोप चर्चेदरम्यान आमदार बदामराव पंडित यांनी केला. उत्तरात अजित पवार म्हणाले, आणीबाणीत मी १६ वर्षाचा होतो. एनडी पाटील माझे मामा जेलमधे होते. आमचे सरकार नव्हते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आणीबाणात तुरुंगवास भोगलेल्यांपैकी अनेकांनी स्वत:हून पेन्शन नाकारली आहे. मिसाबंदीधारकांचा सन्मान झाला पाहीजे, असे सरकारचे धोरण आहे. भविष्यात मानधनवाढीचा विचार करु, सर्वांना सन्मानपत्र देण्यात येईल. असे म्हणाले.

Last Updated : Jun 25, 2019, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details