मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे याची शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून तत्काळ उचलबांगडी ( Shinde Fired From Group Post ) केली. परळ-शिवडीमधील कट्टर शिवसैनिक आणि आमदार अजय चौधरी यांची गटनेतापदी वर्णी लागली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना या संदर्भातील पत्र आज देण्यात आले.
विधानसभा उपाध्यक्षांना नियुक्तिपत्र : यासंबंधी शिवसेनेच्या महत्त्वाचे नेत्यांनी विधान सभा उपाध्यक्षांची ( Deputy Speaker of the Legislative Assembly ) भेट घेतली. त्यांना हे पत्र देण्यात आले आहे. शिवसेना गटनेते नियुक्तिपत्र ( Group Leader Appointment Letter )उपाध्यक्षांना ( Narhari Jirwal ) देताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, आमदार राजन साळवी, मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते.
गटनेते पदावरून शिंदे यांची हकालपट्टी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून शिंदे यांना हटवण्यात आले. त्याऐवजी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना देण्यात आले. शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी त्यावर सूचक अनुमोदन दिले आहे. तर उदय सामंत, राजन साळवी यांनी अनुमोदन दिलेले पत्र उपाध्यक्ष झिरवळ यांना विधिमंडळात देण्यात आले. शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून काढून टाकल्याने शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.