मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींसह मुंबईत ऑटो रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात 3 रुपयांची वाढ झाल्याने लोकांना आता किमान 21 रुपये द्यावे लागणार आहेत. पण आता लोकांना वातानुकूलित प्रवासाचा आनंद अवघ्या ६ रुपयांत मिळणार आहे. कोरोनामध्ये लोकं बेरोजगार असून पैशांची कमी आहे. प्रभाग क्रमांक २ मधील शिवसेनेचे नगरसेवक शंकर हुंदरे यांच्या नेतृत्वात क्रांती नगर बसस्थानकावरून कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ एसी बस सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले आहे.
बस सुविधेचे उद्घाटन करताना हेही वाचा -मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी बोलाविली मराठा नेत्यांची बैठक
ही बस प्रत्येक स्टॉपवर थांबेल आणि प्रवाशांना फक्त 6 रुपयांमध्ये एसीचा आनंद लुटता येईल, असे नगरसेवक शंकर हुंदरे यांनी यावेळी सांगितले. या प्रभागात दर मिनिटांनी बस सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही हुंदरे यांनी सांगितले.
शंकर हुंदारे यांनी खूप चांगले काम केले आहे. या बस सुविधेचा फायदा 1 लाख 50 हजाराहून अधिक लोकांना होणार आहे. ऑटो रिक्षाचालकांची मनमानी तसेच भाडे वसूल करण्याबरोबरच ते ऑटो रिक्षात ५ जणांना घेऊन जात असतात. त्यामुळे आता नागरिकांना फक्त सहा रुपयांमध्ये प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.
हेही वाचा -एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून मंत्री उदय सामंतांचा विरोधकांवर पलटवार