मुंबई - क्रॉफर्ड मार्केट परिसरातील लोहार गल्लीत 6 मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीचे नाव अहमद बिल्डिंग असे आहे. इमारत कोसळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
हेही वाचा -दुर्घटनाग्रस्त अहमद इमारतीमधून 6 जणांना सुखरूप काढले बाहेर
इमारत कोसळत असताना इमारतीखाली 2 वाहने उभी होती. इमारत कोसळताना रस्त्यावरील उभ्या असलेल्या नागरिकांनी पळण्यास सुरुवात केली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
मुंबईतील लोहार चाळीतील इमारत कोसळल्याची दृश्ये काय आहे घटना
क्रॉफर्ड मार्केट परिसरातील लोहार गल्लीत ही 6 मजली अहमद इमारत आहे. ही इमारत म्हाडाची सेझ इमारत आहे. आज सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला. ही इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. इमारत कोसळली त्यावेळी या इमारतीमध्ये 6 जण असल्याची माहिती येथील स्थानिक रहिवाशी अर्जुन टावरे यांनी दिली.
हेही वाचा - मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये सहा मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही
अहमद इमारतीमध्ये २ कुटुंब राहत होती. तसेच एक गोडाऊन भाड्याने देण्यात आले होते. इमारत कोसळताना हे दोन कुटुंबीय वरच्या मजल्यावर अडकले होते. त्यांना एक इमारत सोडून बाजूला असलेल्या इमारातीमधील गोडाऊनच्या दरवाजामधून रस्सी आणि शिड्या लावून बाहेर काढण्यात आले. इमारतीमधून 6 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये 1 महिला आणि 5 पुरुष आहेत. त्यामधील 2 जण बाहेरील होते, असे अर्जुन टावरे यांनी सांगितले. घटनेनंतर अग्निशमन दल, मुंबई महापालिका अधिकारी व पोलीस अधिकारी धटनास्थळी दाखल झाले. सध्या याठिकाणी इमारतीचा मलबा उचलण्याचे काम सुरू आहे.