मुंबई - परळ येथील वाडिया रुग्णालय प्रशासनाने 'बाई जेरबाई वाडिया' आणि 'नौरोजी वाडिया' ही दोन्ही रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे महानगरपालिकेकडून अनुदान थकित असल्याचे कारण पुढे करण्यात आले. परंतु, वाडिया रुग्णालयाच्या जागेत पुनर्विकास करण्यासाठी डाव आखल्याचा आरोप भाजप नेते अशिष शेलार यांनी केला आहे. तसेच भाजप हे रुग्णालय बंद होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. शहरात जागेची किंमत मोठी आहे. यासाठीच हे रुग्णालय बंद करण्याचा डाव आहे, असे शेलार म्हणाले.
90 वर्षांपेक्षा जुने असलेले हे रुग्णालय गिरणी कामगार तसेच गरिबांसाठी पालिका आणि ट्रस्टच्या करारातून तयार झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. वाडिया प्रकरणात 'तेरी भी चूप; मेरी भी चूप' अशी मनपा आणि प्रशासनाची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.