महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पीक नुकसानीसाठी 701 कोटी मंजूर केल्याबद्दल कृषिमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार - Crop Damage Center Help dadaji bhuse

आज लोकसभेमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, त्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी धन्यवाद दिले आहे.

crop damage dadaji bhuse information
पीक नुकसान 701 कोटी मदत

By

Published : Jul 27, 2021, 10:11 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात एनडीआरएफ मधून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. या अनुषंगाने आज लोकसभेमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पिकांच्या नुकसानीसाठी 701 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, त्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी धन्यवाद दिले आहे.

हेही वाचा -आता मुंबईतच होणार जिनोमिक सिक्वेंसिंग चाचण्या; कोरोना रुग्णांवर उपचार करणे होणार सोपे

गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी 3 हजार 721 कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने निर्णय घेवून शेतकऱ्यांना 4 हजार 375 कोटी पिकांच्या नुकसानीपोटी वाटप केले. राज्याने केलेल्या 3 हजार 721 कोटी रुपयांच्या मागणीपैकी 701 कोटी रुपये मदत देण्याचे आज केंद्र शासनाने घोषित केले आहे, अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

सध्याच्या नुकसानीसाठी देखील तातडीने मदतीची विनंती

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोकण, तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे केंद्राला आर्थ‍िक मदतीची विनंती करणार असून केंद्र सरकार याची योग्य ती दखल घेवून तातडीने मदत करेल, अशी अपेक्षा कृषी मंत्री भुसे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -राज्याला अतिवृष्टीचा १७०० कोटींचा फटका; सहा जिल्ह्यात आठ हजार व्यापाऱ्यांचे नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details