मुंबई - राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज माजी केंद्रीय कृषी मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मंगळवारी सदिच्छा भेट घेतली. खासदार पवार यांचा कृषी क्षेत्राचा अभ्यास आणि त्यांचे योगदान पाहता राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरीसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असे भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा - महागाईचा दर 5 टक्क्यापेक्षा जास्त वाढणे हे धोक्याचे - अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी
भुसे यांनी पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामीण भागाचे अधिकाधिक दौरे केले पाहिजे. कृषी विद्यापीठांची महत्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन शेतीच्या विकासासाठी त्याचा योग्य तो वापर करणे, कृषी क्षेत्रात ज्या संस्थांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे, त्यांच्या भेटी घेणे. आदी बाबी पवारांनी भुसे यांना सांगितल्या समजते.
हेही वाचा -'सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत', म्हणून...