मुंबई- राज्यातील शेतकरी विविध शेतमाल उत्पादित करत असतो. मात्र, या शेतमालाचा विपणन करणे आणि निर्यात योग्य बनवणे. या तंत्राचा अभाव शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे निर्यातीचे तंत्र राज्य सरकार शेतकऱ्यांना शिकवणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नाही. विविध पिकांबाबत शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी शेतात उत्पादित केलेला माल निर्यात योग्य कसा करता येईल. त्याला चांगले पॅकेजींग करून बाजारात कसा आणता येईल. या विषयी प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्यातील ३५२ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सरकारने सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी आपले उत्पादन निर्यात योग्य करून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये येऊन थेट विक्री करावी, हा यामागील उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
कृषी अधिकाऱ्यांना पुण्यात प्रशिक्षण - भुसे
शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाच्या विपणनाचे प्रशिक्षण देण्यासाठी ३५२ कृषी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या कृषी अधिकाऱ्यांचे सध्या पुण्यात प्रशिक्षण सुरू असून त्यानंतर हे कृषी अधिकारी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना निर्यात योग्य उत्पादन करण्याचे तंत्र अवगत होईल, असा विश्वास कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे.
जे विकणार तेच पेरणार - भुसे