मुंबई - विद्युत विभागाच्या खासगीकरणाविरोधात व कामगारांना नोकरीत सुरक्षा मिळावी म्हणून आज विद्युत विभागाच्या कंत्राटी कामगार संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारने मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील पॉवर स्टेशन बंद ठेवण्याचा इशारा कंत्राटी कामगारांनी दिला आहे. कामगार संपावर गेल्यास संपूर्ण महाराष्ट्र बेमुदत काळासाठी अंधारात जाऊ शकतो.
माहिती देताना आंदोलनकर्ते हेही वाचा -अभिनेत्री कंगना रणौतच्या दोन याचिका दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळल्या
नेमक्या मागण्या काय?
यावेळी बोलताना कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष वामन गुठले म्हणाले की, आमच्या दोनच मागण्या आहेत एक म्हणजे विद्युत मंडळाचा खासगीकरण थांबवा व दुसरी म्हणजे, आमच्या कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षांपर्यंत नोकरीत सुरक्षा मिळाली पाहिजे. कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असतात. पण, या कामगारांना जॉब सिक्युरिटी नाही. आमचे हे काम मागील सरकारने देखील नाही केले आणि आताचे सरकार देखील करत नाही आहे.
कॉन्ट्रॅक्ट संपले की कर्मचारी बेरोजगार
वामन गुठले सांगतात की, आम्ही कंत्राटी कामगारांसाठी जॉब सिक्युरिटी मागतो आहे. कारण, इथे आमचे कामगार अनेक वर्ष राब राब राबतात आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट संपले की, आमचा कामगार बेरोजगार होतो. त्यांना दोन दोन तीन तीन महिने घरी बसावे लागते, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. हे चित्र बदलावे म्हणूनच आमची ही संरक्षणाची मागणी आहे.
..तर संपूर्ण महाराष्ट्रातील पॉवर स्टेशन ठेवणार बंद
पॉवर स्टेशन संघटनेचे सचिव रोषन गोस्वामी म्हणाले की, आमच्या संघटनांनी सरकारशी पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, यातील एकाही पत्राला सकारात्मक उत्तर न आल्याने आम्ही आज हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. आमच्या मागण्या मान्य न केल्यास 28 आणि 29 तारखेपासून आमचे कर्मचारी संपूर्ण महाराष्ट्रातील पॉवर स्टेशन बंद ठेवून बेमुदत संपावर जातील, असा इशारा कंत्राटी कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा -BJP Morcha : उद्धवजी, बाळासाहेबांना काय उत्तर द्याल? फडणवीसांचा सवाल; फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांना घेतले ताब्यात