मुंबई -शहरातील सर्वात जुने नौरोसजी वाडिया रुग्णालय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याचे कारण पालिका प्रशासन आणि राज्य शासनाने जितके अनुदान द्यायला हवे, तितके अनुदान सध्या रुग्णालयाला मिळण्यास विलंब होत आहे. यामुळेच हे रुग्णालय बंद होऊ नये, यासाठी वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तसेच कामगार एकत्र येत रुग्णालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
वाडीया रुग्णालयाबाहेर कर्मचारी आणि कामगार युनियनचे धरणे आंदोलन हेही वाचा... आव्हाड म्हणतात ते दोघेच एकमेकांचे शनि; तर शनिदेवालाच 'यांचा' शनि लागायचा बच्चू कडूंचा टोला
या रुग्णालयात गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी हे रुग्णालय वाचले पाहिजे असे सांगितले आहे. 'महापालिका व राज्य शासन वाडिया रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर काहीही आक्षेप घेत अनुदान रोखून धरत आहे. तसेच त्याबद्दल शासनाने एक समिती नेमली आहे. त्यालाही जास्तीचा कालावधी लोटला असून मुंबईतील गरीब कामगार, कष्टकरी जनतेच्या रुग्णसेवेवर याचा परिणाम होत आहे. या रुग्णालयात साधारणतः दररोज 50 ते 60 रुग्ण येतात. त्यांच्यावर येथे चांगल्या प्रकारचे उपचार केले जातात. त्यामुळे सरकारने या रुग्णालयाला लवकरात लवकर अनुदान द्यावे, तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित वेतन द्यावे', अशी मागणी येथील आंदोलक करत आहेत.
हेही वाचा...'त्या' पुस्तकावर तत्काळ बंदी घाला; अन्यथा....., संभाजी ब्रिगेडचा इशारा
वेतन, पेन्शन आणि अनुदान या प्रश्नावर नौरोसजी वाडिया रुग्णालयाचे कामगार आणि कर्मचारी यांच्या लालबावटा जनरल कामगार युनियनने रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. महापालिका व राज्य शासन यांनी अनुदान दिले नाही, हे कारण सांगून वाडिया व्यवस्थापनने कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही. तसेच निवृत्त कामगारांचे पेन्शन बंद केले आहे. युनियनने प्रशासनाच्या या कृत्याचा तीव्र विरोध केला असून रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला आहे. युनियनने ज्या मागण्या केलेल्या आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी लालबावटा युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांनी केली आहे.
हेही वाचा... महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कार दरीत कोसळली; पत्नीचा मृत्यू, पती जखमी
महाराष्ट्र शासनाने वाडिया रुग्णालयाच्या अनुदानाची थकीत बाकी लवकरात लवकर द्यावी. नौरोसजी वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी सुमारे दहा कोटी दहा लाख इतकी असून ती देखील त्वरित देण्यात यावी. आदी मागण्यांसाठी लालबावटा युनियन तसेच इतर कामगारांनी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. कामगारांच्या या आंदोलनाला प्रशासन कशा प्रकारे हाताळणार आणि सरकार वाडिया रुग्णालयाला जीवनदान देणार का? हे आता पाहावे लागेल.