महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरूच; आझाद मैदानावर ठिय्या - no-grant teachers

मुंबईतील आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरुच आहे. १९ सप्टेंबर २०१६ चे निर्णय रद्द करावे आणि २० टक्के अनुदान घेणाऱ्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, ही शिक्षकांची प्रमुख मागणी आहेत.

आझाद मैदानावर ठिय्या

By

Published : Sep 10, 2019, 12:48 PM IST

मुंबई- गेल्या महिन्याभरापासून राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरूच आहे. राज्यभरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा मंगळवारी बंद आहेत. शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.

विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरूच

औरंगाबाद व मुंबईमध्ये संतप्त झालेले आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. त्यानंतर शिक्षक आमदारांनी विधान भवनाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. या सर्व नाट्यपूर्ण घडामोडीनंतर शासनाने २० टक्केअनुदानाची घोषणा केली. त्याचप्रमाणे ज्या शाळांना अनुदान मिळत आहे, त्यांच्या अनुदानात २० टक्के वाढ करून ते ४० टक्के करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर शिक्षकांचे आंदोलन सुरूच आहे.

हेही वाचा - राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती नाही; भावी अधिकाऱ्यांचे पुण्यात आंदोलन

१९ सप्टेंबर २0१६ चे निर्णय रद्द करावे आणि २० टक्के अनुदान घेणाऱ्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे, ही शिक्षकांची प्रमुख मागणी आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेचे समिती सचिव प्रशांत रेडीज यांनी दिले आहे. सरकार शिक्षकांना निवडणूकीच्या तोंडावर अल्पप्रमाणात अनुदानाचे आश्वासन देतात. लोकसभा निवडणुकीच्या काळातही आश्वासन दिले होते ते अजूनही पूर्ण नाही झाले. त्यामुळे सरकारवर शिक्षक संघटना विश्वास ठेवायला तयार नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details