मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP protest against Sharad Pawar house attack ) आणि काँग्रेसकडून मंत्रालय परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.
हेही वाचा -Sanjay Raut on Silver Oak Attack : 'राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र'
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या आंदोलनाचा निषेध केला. शरद पवार यांच्या घरावर झालेले आंदोलन नसून तो हल्ला होता. यामागे राजकीय षडयंत्र असल्याची शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. या निर्णयाचे स्वागत खुद्द एसटी कर्मचाऱ्यांनी आनंदात केला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आनंद व्यक्त केल्यानंतर शरद पवार यांच्या घरावर आंदोलन करणे चुकीचे होते. तसेच, या आंदोलनाच्या मागील सूत्रधाराला शोधले जाईल, असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे. एकूणच शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरात त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
हेही वाचा -Mumbai Dabbawala : पूर्वीची स्थिती परत आणण्यासाठी झटतोय मुंबईचा डब्बेवाला