मुंबई -मुंबईमध्ये साफसफाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना (BMC Cleaning Worker Agitation) योग्य सुविधा नसल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ या कर्मचार्यांवर आली आहे. आज चेंबूर येथील विभागाच्या कार्यालयासमोर सफाई कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले.
या आहेत सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या -
मुंबई महापालिकेतील चेंबूरच्या एम पश्चिम विभागातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या बाहेर विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांना विविध समस्या असून ड्युटीवर असताना बसायला दिलेली जागा, निकृष्ट दर्जाचे झाडू, कचरा जमा करायला दिलेले खराब डबे तसेच परीक्षण खात, पाणी खात, यामध्ये सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती वारसा नावे सेवानिवृत्त मृत्यू पावलेल्या कामगारांचे दावे, या सर्व मागण्यासाठी आंदोलन केले. म्युनिसिपिल मजदूर युनियनच्यावतीने नेते सुखदेव काशीद यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करून लवकरात लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर 'कामबंद आंदोलन' करण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांच्यावतीने देण्यात आला.