मुंबई -अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. लोकशाही पद्धतीने आम्ही कलाकारांविरोधात आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना इंधन दरवाढीवर कलाकारांनी ट्विट केले होते. मात्र, आता इंधन दरवाढीवर कलाकार गप्प का? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला आहे. तसेच कलाकार मोदी सरकारच्या दबावात आहेत असेही नाना पटोले म्हणाले.
टिवटिव करणारे अभिनेते आता कुठे गेले?
काँग्रेस सत्तेवर असताना मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे सतत ट्विटरवर त्यांच्याविरोधात लिहित होते. मात्र, सातत्याने ट्विटरवर टिवटिव करणारे हे अभिनेते आता कुठे गेले? महाराष्ट्रात त्यांच्या सिनेमा आणि शूटिंगवर आम्ही बंदी आणणार आहोत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली असल्याचे नाना पटोले यांनी भंडाऱ्यात सांगितले होते.
हेही वाचा -टिव टिव करणारे अभिनेते गेले कुठे? राज्यात त्यांचे शूटिंग बंद पाडू- नाना पटोले
हेही वाचा -अभिनेत्यांबद्दल बोललं की आपसूकच प्रसिद्धी मिळते; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोले यांना टोला