मुंबई :राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख राहिलेल्या डॉक्टर रश्मी शुक्ला यांनी पाठवलेल्या एका गोपनीय पत्राचा खुलासा समोर आलेला आहे. राज्यात काही आयपीएस अधिकारी हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या या 'क्रीम पोस्टिंग'वर करण्यासाठी पैसे घेत असून, यासाठी त्यांनी काही एजंट नेमले असल्याचे या रिपोर्टमध्ये डॉक्टर रश्मी शुक्ला यांनी नमूद केलेला आहे.
कुठल्या गोष्टींचा आहे उल्लेख..
25 ऑगस्ट 2020 रोजी हा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैसवाल यांना पाठवण्यात आल होता. यामध्ये याबद्दल मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली जावी, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख राहिलेल्या डॉक्टर रश्मी शुक्ला यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये काही गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. राज्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या त्यांच्या मनाप्रमाणे करण्यात याव्यात म्हणून काही एजंट सक्रिय झाले असून, या संदर्भात काही जणांचे फोन कॉल टॅप करण्यात आलेले होते. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज्यात सध्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले जात असून, ही खूपच गंभीर बाब असल्याचे या म्हटलेले आहे. हे पत्र 25 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैसवाल यांना देण्यात आलं होतं.
डॉक्टर रश्मी शुक्ला यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे, की अशाच प्रकारचे प्रकरण जून 2017 मध्ये समोर आले होते. त्यावेळी या प्रकारामध्ये 7 आरोपी दाखवण्यात आले होते. यामध्ये बंदा नवाज मनेर हा पोलिसांच्या अभिलेखावर असलेला गुन्हेगार ताब्यात घेण्यात आला होता. या संदर्भात एक उच्चस्तरीय समितीकडून चौकशी केली जावी, व कडक कारवाई करत अशा प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यात यावा असे या पत्रामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : पैसे मोजायचे मशिन, फाईव्ह स्टार हॉटेलमधील राहणी, आता सापडली गोपनिय डायरी