महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आज...आत्ता... दुपारी २ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर... - accident

धक्कादायक ! कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून अंत्ययात्रेवर कंजारभाट समाजाचा बहिष्कार. मॉर्निंग वॉकला गेलेल्या ३ वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले. 'हल्दीराम'च्या सांबारमध्ये आढळले पालीचे मेलेले पिल्लू. सीआरपीएफ नसते, तर मी तिथून जिवंत बाहेर पडलो नसतो - अमित शाह. काँग्रेसला मत दिले म्हणून भावावर झाडली गोळी, भाजप समर्थकाचे कृत्य.

महत्त्वाच्या बातम्या

By

Published : May 15, 2019, 2:08 PM IST

धक्कादायक ! कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून अंत्ययात्रेवर कंजारभाट समाजाचा बहिष्कार

ठाणे - अंत्यविधीच्या कार्यक्रमावर कंजारभाट समाजाने बहिष्कार टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अंबरनाथ शहरात राहणाऱ्या विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला होता. त्यामुळे कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास समाजातील लोकांना मज्जाव केला होता. वाचा सविस्तर...

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ३ वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडले

पुणे - नगर -कल्याण महामार्गावर उदापूर जवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. यामध्ये तीनही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. मीराबाई सुदाम ढमाले ( वय 60 ), कमल महादेव ढमाले ( 62 ), चांगुणा रामभाऊ रायकर ( 70 ) असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध महिलांची नावे आहेत. वाचा सविस्तर...

'हल्दीराम'च्या सांबारमध्ये आढळले पालीचे मेलेले पिल्लू

नागपूर - शहरातील अजनी चौकातील प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात पालीचे पिल्लू आढळल्याची घटना घडली आहे. याबाबत यश अग्निहोत्री या व्यक्तीने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. वाचा सविस्तर...

सीआरपीएफ नसते, तर मी तिथून जिवंत बाहेर पडलो नसतो - अमित शाह

नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीदरम्यान भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांदरम्यान तुंबळ हाणामारी झाली. यानंतर बंगालमध्ये हिंसाचार भडकला होता. तसेच, विद्यासागर महाविद्यालयातील ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्यात आला. यानंतर आज अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये 'सीआरपीएफ नसते तर, मी तिथून जिवंत बाहेर पडलो नसतो,' असे अमित शाह यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...

काँग्रेसला मत दिले म्हणून भावावर झाडली गोळी, भाजप समर्थकाचे कृत्य

झज्जर - हरियाणामध्ये एका भाजप समर्थकाने काँग्रेसला मत दिल्याच्या रागातून स्वतःच्या चुलत भावावर गोळी झाडली. या हल्ल्यात भावाची आईदेखील जखमी झाली आहे. या माय-लेकांवर उपचार सुरू आहेत. १२ मे रोजी येथे काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. धर्मेंद्र असे हल्लेखोराचे नाव असून त्याने त्याचा भाऊ राजा याच्यावर गोळी झाडली. वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details