मुंबई -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलना संदर्भात आज (बुधवारी) दिलेल्या इशारा नंतर मुंबईतील 1144 मशिदीपैकी केवळ 135 मशिदीवरील भोंग्यांव्दारे अजान देण्यात आले. राज ठाकरे यांनी ( MNS chief Raj Thackeray ) दिलेल्या अल्टिमेटमनंतर मुंबई पोलिसांनी मनसेसैनिकांना ( Mumbai police arrested MNS Worker ) धरपकडीची कारवाई सुरू केली. मुंबईतील अनेक मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहे.
मुंबई पोलिसांनी 806 मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी दिली आहे. 1144 मशिदींवर भोंगे लावण्यासाठी परवानगी मागणारे अर्ज प्राप्त झाले होते. मात्र सायलेंट झोनमध्ये असलेल्या मशिदींवर भोंगे लावण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मुंबईतील 1144 मशिदींपैकी 135 मशिंदीकडून आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. मुंबईतील 135 मशिदींवर आज पहाटे 6 वाजण्यापूर्वीच भोंगे वाजल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. त्यामुळे या मशिदींवरील संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गृह विभागाकडून सांगण्यात आले आहे.