मुंबई - संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे राठोडांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. पण गेल्या दीड वर्षात पोलिसांच्या झालेल्या तपासात त्यांना क्लीन चीट मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केला होता. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना विरोध केला होता. तसेच, विविध स्तरावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. अखेर या टीकेवर संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे.
माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करायचा प्रयत्न झाला - मी निष्कलंक निःपक्षपाती चौकशीसाठी मी स्वतः राजीनामा दिला. आता पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे। जेव्हा आरोप झाले तेव्हा मानसिक तणावात होतो. गेली ३० वर्षे राजकीय, सामाजिक जीवनात वावरतोय. मात्र, माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करायचा प्रयत्न झाला. या आरोपामुळे बाजूला होतो. आता पोलिसांनी राजपत्र प्रकाशित केले आहे. त्यामुळे निष्कलंक असून शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये शपथविधी घेतल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.