मुंबई -मुंबईला केंद्रशासित करावे का? हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईवर नेहमीच गुजरातचा डोळा ( Gujarat eye on Mumbai ) होता. इतकच काय संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर महाराष्ट्राला ( United Maharashtra Movement ) गुजरातकडून मुंबई 60 कोटी रुपयांना विकत ( Bought Mumbai ) घ्यावी लागली. हे सत्य नाकारून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. मुंबईसाठी महाराष्ट्राने गुजरातला पैसै ( Maharashtra paid Gujarat for Mumbai. ) मोजले. मात्र, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव ( Plot cut off Mumbai from Maharashtra ) आहे. मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा केंद्राचा डाव आहे, अशी ओरड सातत्याने केली जाते. मुंबईवर गुजरातचा डोळा आहे. असे म्हटले जाते यात किती तथ्य आहे, हा वादाचा मुद्दा असला तरी मुंबईवर वर्चस्व मिळवण्याचा गुजरातचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. हे नाकारता येत नाही.
मुंबईचे महत्त्व कमी कण्याचा प्रयत्न -मुंबईतील मोठे उद्योग गुजरातला हलवायचे, मुंबई आर्थिक खिळखिळी करायची हा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे तिच्यावर या दृष्टीने हल्ला केला पाहिजे असे काही नेत्यांना वाटते. मुंबईची ओळख ही केवळ आर्थिक किंवा उद्योग नगरी नाही, तर ती कॉस्मोपॉलिटन नगरी आहे. यातच तिचे सामर्थ्य आहे. त्यामुळे मुंबईचे महत्त्व कमी कण्याचा प्रयत्न सुरूआहे. मुंबई साठ कोटींना विकत घेतली.
साठ कोटींना विकत घेतली मुंबई -मुंबई महाराष्ट्र, गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात येणार ही काळ्या दगडावरची रेघ ठरल्यानंतर राज्यघटनेच्या ७ व्या, ८व्या परिशिष्टात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. कलम ४२ (२), ४८ (१), कलम ५१ (५) अनुसार गुजरात राज्याची राजधानी विकसित करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राज्याच्या कॅश बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाऊंटमधून १० कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात यावी असे प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर गुजरात राज्याची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी १९६० साली ६.०२ कोटी रुपयांपासून सुरुवात करून १९६९-७० पर्यंत १.१४ कोटी अशा क्रमाने रकमा द्याव्या, असे ठरले.
हेही वाचा -Maharashtra Cabinet : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा; युवकांवर दाखल झालेले 'ते' गुन्हे मागे घेणार
मुंबईसाठी मोजले ६० कोटी ६६ लाख -याखेरीज १९६२-६३ पासून १९६९-७० पर्यंत ८ आथिर्क वर्षांत गुजरातला २८.३९ कोटी रुपये लाभ व्हावा असाही निर्णय झाल्याचे जोशी सांगतात. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट १९६०च्या कलम ५२ खाली महाराष्ट्राने गुजरातला १९६२-६३ साली ६१२ लाख, ६३-६४ साली ५८५ लाख, ६४-६५ साली ५०१ लाख, ६५-६६ साली ५२६ लाख, ६६-६७ साली ४३३ लाख, ६७-६८ साली ३४० लाख, १९६८-६९ साली २०९ लाख असे ३२ कोटी ६६ लाख रुपये दिले. यात नव्या तरतुदीनुसार दिलेले ३८ कोटी धरून एकूण ६० कोटी ६६ लाख रुपये महाराष्ट्राने गुजरातला दिल्याची नोंद 'द गॅझेट ऑफ इंडिया एक्स्ट्रा ऑडिर्नरी'मध्ये आहे. याचा अर्थ, मुंबईवरील ताबा राखण्यासाठी महाराष्ट्राला ६० कोटींची किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे मुंबई आपण विकत घेतलीय. असा दावा जोशी यांनी केला. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त तर आपण सांडले आहेच, पण ६० कोटी ६६ लाख रुपयेही मोजले आहेत.
मुंबईवर गुजरातचा नेहमीचा डोळा – मुंबईवर अनेकांचा डोळा आहे. त्यात गुजराती लोकांचा डोळा सुरुवातीपासूनच मुंबईवर आहे. म्हणूनच मुंबईला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी 106 हुतात्मे बलिदान द्यावे लागले. अलीकडे पुन्हा मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणूनच गुजरातला हलवण्यात आल्या येथील डायमंड सिटी गुजरातला हलवण्यात आली. मात्र, असे प्रयत्न करून मुंबईचे महत्व कमी होणार नाही. कारण मुंबईत केवळ राजकीय, आर्थिक केंद्र आहे असे नाही तर, इथले सांस्कृतिक योगदान, येथे असलेली मोकळीक, स्वातंत्र्य हे परदेशी पर्यटकांना नागरिकांना नेहमी आकर्षित करत राहिले आहेत. ते कधीही कमी होणार नाही. त्यामुळे मोठमोठे उद्योग मुंबई बाहेर गेले, तरी मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही. आर्थिक सेवा केंद्र बाहेर गेल्याने काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -Prithviraj Chavan : 'शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवून हिंदुत्ववादी मतं...'; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान