मुंबई :शिवसेनेतील मंत्री ( Chief eight ministers support Ekanath Shinde )आणि 29 आमदार ( Twenty-nine MLAs Support Shinde ) हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात ( After the revolt of Eknath Shinde ) सहभागी झाले आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली असे मानले जात असले तरी आमदार सुनील राऊत ( Shiv Sena MLA Sunil Raut ) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की, कितीही लोक गेले तरी शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. शिवसेना ही शिवसैनिकांच्या बळावर उभी आहे.माझ्याबाबतीत म्हणाल तर मी आमच्या वडिलांपासून शिवसेनेत आहे आणि मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच राहणार.
शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे :गेल्या तीन-चार दिवसांमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि नेते हे आमच्यासोबत असून, गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये मोठे मेळावे होत आहेत. या मेळाव्यांना हजारो शिवसैनिक हजेरी लावून आपण शिवसेनेसोबत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत याची ग्वाही देत आहेत. पक्षातून बाहेर गेलेल्या लोकांवर तीव्र संताप आणि रोष सगळीकडे व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केवळ काही आमदार आणि नेते पक्षातून बाहेर गेले आहेत. त्यामुळे पक्ष फुटेल किंवा पक्षाला काही धोका आहे, असे मला वाटत नाही, असेही मनीषा कायंदे म्हणाल्या.
पाहूयात कोण कोण आहेत शिवसेनेसोबत :
शिवसेना पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी शिवसेनेसोबत : शिवसेनेतील 55 पैकी 39 आमदार हे आता शिंदे गटासोबत आहेत. मात्र, पक्ष संघटनेचा विचार केला तर उद्धव ठाकरे हे अजूनही शिंदे गटावर वरचढ आहेत. शिवसेनेत महत्त्वाचे मानले जाणारे नेते हे पद आहे. या पदावर काम करणारे 12 नेते, तीस उपनेते, पाच सचिव आणि एक मुख्य प्रवक्ता तसेच दहा अन्य प्रवक्ते हे शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे आहेत. पक्षाचे अध्यक्ष पद हे सर्वोच्च पद असते हे पद उद्धव ठाकरे यांच्याकडे कायम आहे. त्यानंतर महत्त्वाचे पद आहे ते म्हणजे नेता. हे पद या बारा नेते पदांपैकी एकनाथ शिंदे हे एक नेते वगळता उरलेले अकरा नेते अजूनही शिवसेनेसोबत आहेत ज्यांनी बंडखोरी केलेली नाही.
उद्धव ठाकरेंसोबत पक्षातील नेते : शिवसेनेमध्ये तीस उपनेते आहेत. यामध्ये बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील, आमदार तानाजी सावंत, यशवंत जाधव हे उपनेते वगळले तर उरलेले सर्व उपनेते उद्धव यांच्यासोबत काम करीत आहेत. पक्षामध्ये सचिव या महत्त्वाच्या पदावर पाच लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मिलिंद नार्वेकर खासदार विनायक राऊत आणि सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्ष आदेश बांदेकर यांचा समावेश आहे. हे सर्व पाचही जण उद्धव यांच्यासोबत उभे आहेत.