महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mulayam Singh Yadav Death : मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील नेत्यांकडून दुःख व्यक्त

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन (Mulayam singh Yadav death) झाले. मुलायम सिंह यादव 82 वर्षांचे होते आणि दीर्घकाळ आजारी (Mulayam singh Yadav founder of Samajwadi Party) होते. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दुःख व्यक्त करण्यात आले आहे. तर अनेक नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Mulayam Singh Yadav Death
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दुःख व्यक्त करण्यात आले

By

Published : Oct 10, 2022, 1:17 PM IST

Updated : Oct 10, 2022, 2:39 PM IST

मुंबई : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच आज दीर्घ आजारामुळे दिल्लीतील रुग्णालयात निधन ( Mulayam Singh Yadav Death ) झाले. मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. मुलायम सिंग यादव देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नेते होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर देशातल्या सर्वच राजकीय पक्ष आणि ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त केली जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी मुलायम सिंह यांच्या आठवणीला उजाळा देत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे ट्विट



राष्ट्रवादीकडून मुलायम सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त :मुलायम सिंह निधनाची बातमी कळताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करून मुलायम सिंह यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. देशातील वेगवेगळ्या मोठ्या पदांवर मुलांचे काम केले. अतिशय दिलदार आणि मोठ्या अंतकरणाचे नेते म्हणून त्यांना देशभरात ओळखले जायचे तसेच त्यांना नेताजी म्हणूनही संबोधले जात होते अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी ट्विट ( Supriya Sule Tweet ) माध्यमातून व्यक्त केली.


माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला शोक :समाजवादी पार्टीचे जेष्ठ नेते मुलायम सिंह यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून छगन भुजबळ देशाच्या राजकाणातील अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपले असल्याच्या भावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. आपल्या शोक संदेशात ते म्हणाले की, मुलायम सिंह यादव म्हणजे मातीशी नाळ जोडलेला नेता. उत्तरप्रदेशच्या राजकारणात त्यांचा विशेष असा दरारा असायचा. नेताजी अशी ओळख असलेले मुलायम सिंह हे खऱ्या अर्थाने राजकारणाच्या आखाड्यातील कसलेले पैलवानच होते. शेतकऱ्यांसाठी आपला आवाज बुलंद ठेवानारे मुलायम सिंह यादव यांची लोकसभेतील भाषणे आजही पहिली की त्यांच्यातला संघर्षशील नेत्याचे दर्शन होते अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले ट्विट :सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आणि देशातील मोठ्या नेत्यांपैकी एक असणारे समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या निधन झाल्याची बातमी समजल्यावर दुःख झाले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील ट्विट करत मुलायम सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

जयंत पटिल ट्विट

सुभाष लांडे यांच्याकडून मुलायम सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त :देशातील राजकीय क्षेत्रातील धुरंदर व्यक्तिमत्व तसेच समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेश या राज्याचे माजी मुख्यमंत्री मुलांचे यादव यांचा नुकताच निधन झाल्याची वार्ता समजल्यावर देशातून हळहळ व्यक्त होत आहे राजकीय मतभेद विसरून विविध पक्षातील नेते त्यांच्या संदर्भात शोक व्यक्त करत आहेत. देशातील मार्क्सवादी डाव्या पक्षांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत. महाराष्ट्रातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुभाष लांडे यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना मुलायम सिंग यादव यांच्या निधनामुळे धर्मनिरपेक्ष राजकारणाची हानी झाले असे म्हटले.

Last Updated : Oct 10, 2022, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details