मुंबई - पत्राचाळ गैरेव्यवहार प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ( ED Arrest Sanjay Raut) अटक केल्यानंतर आता शिवसेनेची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अगोदर एकनाथ शिंदे सहित ४० आमदारांचे बंड. त्यानंतर खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात केलेली अटक, आता ईडीच्या निशाणावर असलेले माजी परिवहन मंत्री शिवसेना नेते अनिल परब ( Anil Parab ) यांच्यावर सुद्धा ईडीची टांगती तलवार आहे. याच अनुषंगाने भाजप नेते नितेश राणे ( BJP leader Nitesh Rane ) यांनी एक वादग्रस्त ट्विट करत यामध्ये ( BJP leader Nitesh Rane tweet ) अनिल परब यांचा फोटो शेअर करत, कही देर ना हो जाये हे गाणं पोस्ट केल आहे.
कही देर ना हो जाए? भाजप नेते नितेश राणे यांनी अनेकदा अनिल परब यांच्या विषयी ट्विट केले आहे. परंतु आत्ता शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर अनिल परब यांना ईडी कडून कारवाईसाठी उशीर तर होत नाही ना! असं सांगत त्यांनी हिंदी चित्रपटातील, कही देर ना हो जाये, हे गाणं आणि अनिल परब यांचा फोटो ट्विट केला आहे.
हेही वाचा -Sanjay Raut Arrest : संजय राऊत यांना थोड्याच वेळात पीएमएलए न्यायालयात करण्यात येणार हजर
शिवसेनेला दुहेरी झटका? राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांची या अगोदर ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे. दरम्यान, परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार ही असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जर, परब यांना अटक झाली तर, शिवसेनेला खासदार संजय राऊत नंतर दुहेरी झटका बसू शकतो. दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने अनिल परब यांची चौकशी सुरू केली आहे.
काय आहे प्रकरण? अनिल परब यांनी २०१७ मध्ये दापोली येथे एक प्लॉट खरेदी केला होता. प्लॉटच्या नोंदणीनंतर परब यांनी २०२० मध्ये मुंबईतील केबल ऑपरेटर सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटी रुपयांना विकली. यामध्ये अनेक प्रकारची फसवणूक झाल्याचा आरोप परब यांच्यावर करण्यात आला आहे. यादरम्यान, या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्यात आले. त्याच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी काही पुरावे ईडी कार्यालयात सादर केले होते. तसेच अनिल परब यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे तगडे नेते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबई पोलिसांचे माजी एपीआय सचिन वाझे यांनीही त्यांच्यावर ५० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा -क्रुरतेचा कळस..! 'आयएसआयएस'च्या दहशतवाद्यांनी एका महिलेला तिच्याच मुलाचे मांस खायला दिले