मुंबई-वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने दिलेले पोलीस संरक्षण गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील- सदावर्ते यांनी सोडले ( Jayashree Patil leaves Mumbai Police protection ) आहे. मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी ( Silver Oak Attack Case ) एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना 8 एप्रिल रोजी अटक केली ( Guntaratna Sadavarte Arrested ) होती. सध्या गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या कोठडी आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हल्ला प्रकरणात जयश्री पाटील यादेखील आरोपी असून, सध्या त्या पसार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सदावर्ते यांना 8 एप्रिलला अटक केल्यानंतर 9 एप्रिल रोजी जयश्री पाटील यांनी राज्य सरकारने दिलेले संरक्षण सोडले आहे.
दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पसार दाखवण्यात आले ( Police Search To Find Jayashree Patil ) आहे. हे आंदोलन करण्यास जयश्री पाटील यांनीच सांगितल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.