महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik : मलिकांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी आक्रमक; कप्तान मलिक यांनाही ED चे समन्स - महाविकास आघाडी आणि भाजपची एकमेकाविरोधात निदर्शने

महाविकास आघाडीने आज आक्रमक पवित्रा घेत मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहे. मुंबईत मंत्र्यांनी ही निदर्शने केली. (Agitation Against Arrest of Nawab Malik) राज्यात इतरत्रही ही निदर्शने करण्यात येत आहेत. तसेच भाजपनेही नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी राज्यात निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनाही समन्स बजावले आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक

By

Published : Feb 24, 2022, 11:56 AM IST

Updated : Feb 24, 2022, 12:35 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीने आज आक्रमक पवित्रा घेत मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहे. मुंबईत मंत्र्यांनी ही निदर्शने केली. राज्यात इतरत्रही ही निदर्शने करण्यात येत आहेत. (Agitation Against Arrest of Nawab Malik) तसेच भाजपनेही नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी राज्यात निदर्शने सुरू केली आहेत. दरम्यान, दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांना समन्स बजावले आहे.

ईडी कोठडी मिळाल्यानंतर नवाब मलिक यांचं ट्विट

कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा !! : ईडी कोठडी मिळाल्यानंतर नवाब मलिक यांचं ट्विट

मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी

मंत्री नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी.. न्यायालयाचा निकालराष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची ३ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी याबाबत आदेश दिला आहे.

यानंतर महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सर्व मंत्री, आमदार धरणे धरून बसणार असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. ३० वर्षात कधी नवाब मलिक यांचं नाव कुणी घेतलं नाही. मलिक यांचं तोंड बंद करण्यासाठी हा सगळं प्रकार आहेत असे भुजबळ म्हणाले. आमच्या मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी हा प्रकार असेही ते म्हणाले. महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सर्व मंत्री, आमदार धरणे धरून बसणार अशी घोषणा त्यांनी केली. भुजबळराजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही असेही ते म्हणाले.

मलिकांच्या समर्थकांनी केली गर्दी

नवाब मलिक यांची मुलगी, जावई यांच्यासोबत चर्चा केली. अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक हे आरोपीच्या पिंजऱ्यातून खाली येऊन कुटुंबियांसोबत बसले. निलोफर आणि सना या दोन्ही कन्या, जावई समीर खान यांच्यासोबत चर्चा केली. मलिक मंत्री आहेत, त्यांच्याकडे कागदपत्रे मागितली असती तर दिली असती असे वकील देसाई यांनी सांगितले. ईडीकडून मलिकांच्या १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाच्या बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मलिकांच्या समर्थकांनी केली गर्दी केली होती. नंतर मलिक यांना अटक करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

नवाब मलिकांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन केला. यामध्ये त्यांनी प्रकरणाची माहिती घेऊन राज्य सरकारला यामध्ये काय करता येईल, याबाबत मार्गदर्शन केल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर गेले. त्यानंतर शरद पवारांच्या बंगल्यावरील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, राजेश टोपे हसन मुश्रीफ यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहबे थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सुनील केदार हेही उपस्थित होते.

हेही वाचा -Israeli Consulate Threat Call : इस्रायली वाणिज्य दूतावासाला धमकीचा कॉल, एकाला अटक

Last Updated : Feb 24, 2022, 12:35 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details