मुंबई -विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या एका महिन्यापासून ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुनही कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने (St Workers Strike) अखेर संपकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. महामंडळाने आतापर्यत एकूण ९ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरीही कर्मचारी कामावर हजर होत नाही. यामुळे संपात सहभागी होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा बदल्याचा फतवा एसटी महामंडळाकडून काढण्यात आलेला आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांची गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
ST Workers Strike : संप फोडण्यासाठी महामंडळाची शक्कल; आता कारवाईनंतर बदल्यांचा बडगा - एसटी कर्मचारी संपावरच
विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या एका महिन्यापासून ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुनही कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने (St Workers Strike) अखेर संपकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
एसटी कर्मचारी संपावरच
राज्यातील जनतेची हाेणारी गैरसाेय टाळण्यासाठी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर हाेण्याचे आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नसल्याने महामंडळाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महामंडळाने कर्तव्यावर रुजू न हाेणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई सुरु केली. आतापर्यंत ९ हजार ६२५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे महामंडळाने कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय एसटी महामंडळाने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुरू केलेले आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून राज्यभरातील प्रवाशांचे हाल होत आहेत, एसटी बंद असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तर खाजगी वाहन चालक प्रवाशांची लूट करत आहेत. भरघोस वेतनवाढ देऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते.
कामगारांची होणार दमछाक
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना मागील तिथे बदली करून दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात या बदलांचा फायदा झालेला होता. अनेक एसटी कर्मचारी आपल्या गावजवळच्या ठिकाणी कामाला बदल करून घेतली होती. त्यामुळे त्यांना शेती आणि इतर व्यवसायातही लक्ष देता येते होते. मात्र, आता एसटी कामगारांचा बडल्यामुळे एसटी कामगारांची चांगलीच दमछाक होणार आहे. त्यामुळे एक वेळ निलंबनाची कारवाई ठीक पण बदली केल्यास अडचणी वाढतील असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -ST Bus Strike : संपामुळे एसटी महामंडळात नोकर भरती; प्रतीक्षा यादीवरील 50 उमेदवारांना घेतले नोकरीत