मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती असलेल्या असीम निष्ठेला महत्त्व दिले जाते. पक्ष संघटनेने उमेदवारी दिली नाही तरी नाराज न होता बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विषयीच्या निष्ठेला प्राधान्य देऊन शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचाराचे कार्य प्रामाणिकपणे केले जायचे. विशेषत पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणे, पक्षाला अभिप्रेत असलेले कार्य शिवसैनिकांकडून आजवर करण्यात येत होते. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde rebellion) यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेबाबत असलेली पक्षनिष्ठा ( partisanship) आणि पक्षादेश डावलला जात असल्याचे दिसून आले.
सावंताची पक्षनिष्ठा आणि पक्षादेश पक्षाचा आदेश मानून यापूर्वी खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant), अनिल देसाई यांनी केंद्रातील मंत्री पदे नाकारली आहेत. अरविंद सावंत हे केंद्राच्या मोदी सरकारमध्ये शिवसेनेचे एकमेव मंत्री होते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर त्यांनी पक्ष आदेशानुसार थेट अवजड व उद्योग मंत्री पदाचा त्याग केला. भाजपकडून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कंलक लावणारा असून खोटेपणाचा कळस महाराष्ट्रात चालू देणार नाही, असेही त्यावेळी सावंत यांनी ठणकावले होते. सावंत यांची भूमिका पक्षादेश आणि पक्षनिष्ठा आजही अधोरेखित करीत आहे.
देसाई दिल्लीतून माघारी-सन २०१९ मध्ये राज्यात सत्ता संघर्ष निर्माण झाल्याने केंद्र सरकारकडून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न झाला. तसेच अधिकचे एक केंद्रीय मंत्री पद शिवसेनेला देऊ केले. मुंबईतून खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना झाले. परंतु, राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा वाढल्याने शिवसेनेकडून देसाई यांना माघारी येण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी दिले. आदेश मिळताच, खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) यांनी थेट मुंबई गाठली. शिवसेनेशी फारकत घेतलेल्या शिंदे समर्थक आमदारांना परत शिवसेनेत येण्याचे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले होते. तरीही एकाही बंडखोर आमदारांनी पक्षादेश मानला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरांविषयी पक्षादेशाची पायमल्ली केल्याबद्दल असंतोष निर्माण झाला आहे.