महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Protest of IIT Bombay students : अखेर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाची दखल; 4 विद्यार्थ्यांना फी ठरविणाऱ्या समितीवर घेतले - आयआयटी मुंबई फी समिती

गेले पंधरा दिवस आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी ( Protest of IIT Bombay students over fee hike ) शैक्षणिक शुल्क अतोनात वाढल्यामुळे निषेध ( iit bombay news ) आंदोलन केले. या आंदोलनाला आयआयटी ( iit bombay fee hike ) प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. अखेर उपोषणाचे हत्यार ( IIT Bombay students ) आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी उपसले. या सगळ्याचा परिणाम म्हणून आयआयटी मुंबईने चार विद्यार्थ्यांना फी निश्चित करणाऱ्या समितीवर ( iit bombay fee fixing committee ) सदस्य म्हणून घेतले आहे.

iit bombay news
आयआयटी मुंबई विद्यार्थी आंदोलन

By

Published : Aug 8, 2022, 10:41 AM IST

मुंबई -गेले पंधरा दिवस आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क ( Protest of IIT Bombay students over fee hike ) अतोनात वाढल्यामुळे निषेध आंदोलन केले. या आंदोलनाला आयआयटी प्रशासनाने ( iit bombay news ) प्रतिसाद दिला नाही. अखेर उपोषणाचे हत्यार ( iit bombay fee hike ) आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी उपसले. त्यांच्या उपोषणानंतर महाराष्ट्रातल्या विद्यार्थी संघटनांनी ( IIT Bombay students ) पाठिंबा दिला. तसेच, काल आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वारावर ( iit bombay fee fixing committee ) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार धडक मोर्चा देखील झाला. या सगळ्याचा परिणाम म्हणून आयआयटी मुंबईने चार विद्यार्थ्यांना फी निश्चित करणाऱ्या समितीवर सदस्य म्हणून घेतले आहे.

आंदोलनाचे दृश्य

हेही वाचा -Coronavirus New Cases Today : देशामध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, 24 तासांत आढळले 16167 नवे रुग्ण

आयआयटीच्या वतीने फी वाढ - मागील वर्षापर्यंत एमटेक अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क 19 हजार होते, ते आता तब्बल 51 हजार 450 रुपयांपर्यंत पोहचले आहे, तर प्रत्येक सहा महिन्यांसाठी अर्थात सेमिस्टरसाठी मागास विद्यार्थ्यांकडून 16 हजार 500 रुपये शैक्षणिक शुल्क आकारले जात होते, आता त्यात वाढ होऊन 23 हजार 950 रुपये इतके झाले आहे. त्यासोबतच वसतिगृहाची देखील शुल्क वाढ करण्यात आली आहे. जिमखानाच्या संदर्भात देखील दोन हजार रुपये सेमिस्टर शुल्क वाढ करण्यात आली आहे. मेसच्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ केल्यामुळे सर्व प्रवर्गातील विद्यार्थी एकजुटीने प्रशासनाच्या विरोधात आयआयटी मुंबईच्या आवारातच गेले दोन आठवडे आंदोलन करत आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयआयटीमध्ये जोरदार आंदोलन - विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आयटी प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. अखेर छात्र भारती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अशा विविध संघटनांनी आयटीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयआयटीमध्ये जोरदार आंदोलन सुद्धा केले गेले. या सगळ्याचा परिणाम म्हणून आयआयटी प्रशासनाला एक पाऊल पुढे यावे लागले आहे. फी ठरविणाऱ्या आयआयटी प्रशासन समितीसोबत चार विद्यार्थ्यांना आता चर्चा करण्याचा अधिकार मिळालेला आहे. आता यानंतर आयटी प्रशासन फी रद्द करतात की फी कमी करणार हे येत्या काळातच कळेल.

आयआयटीला मिळतो मोठा निधी -आयआयटी मुंबईला केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पानुसार हजारो कोटी रुपयांचा निधी मिळतो. त्याशिवाय प्रति विद्यार्थी देखील रक्कम यूजीसीच्या वतीने आयआयटी मुंबईला दिली जाते. तरी देखील आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांकडून दरवर्षी शुल्क वाढ करते. त्यामुळेच ही शुल्क वाढ विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे उचित नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा -Election Commission Decision : आज निवडणूक आयोगासमोर शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने

ABOUT THE AUTHOR

...view details