मुंबई :Nitesh Rane Demand: केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर बंदी घातल्यानंतर PFI Banned in India आता याचा सर्व ठिकाणी देशभरातून स्वागत होत असताना अशाच पद्धतीची बंदी रझा अकादमीवर घालण्यात Demands To Ban On Raza Academy यावी, अशी मागणी भाजप नेते नितेश राणे BJP leader Nitesh Rane यांनी केली आहे.
काय म्हणालेत नितेश राणे ?देशभरात दहशतवाद, आतंकवादी कारवाया करणाऱ्या पीएफआय या दहशतवादी संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली. या गोड बातमीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi व गृहमंत्री अमित शाह Home Minister Amit Shah यांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद. पीएफआय या संघटनेचा अनेक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी मध्ये समावेश असून देशातील युवकांना बिघडवण्याचं व त्यांच्याकडून देशद्रोही कृत्य करण्याचे काम ही संघटना करत होती. या संघटनेवर बंदी आणल्यामुळे देशातील युवांचे भविष्य आता उध्वस्त होणार नाही, असा संदेश मोदी सरकारने Modi Govt दिल्याचेही नितेश राणे यांनी म्हटल आहे. त्याचप्रमाणे पीएफआय प्रमाणे रझा अकादमीवर सुद्धा बंदी घालण्यात यावी अशी, मागणी ही त्यांनी केंद्र सरकार विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
देशातील वातावरण खिळखिळे करणे :याविषयी बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की पीएफआय विषयी सातत्याने इनपुट हे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या एजन्सीला वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून भेटत होते. दहशतवादी कृत्य करून देशाला खिळखिळे करणे हे एक प्रकारचे देशद्रोही कृत्य असून दुसरीकडे सायलेंटली हळुवारपणे सुद्धा देशाला खिळखिळे करण्याचं काम हे पीएफआय च्या मार्फत केलं जात होतं. देशात राज्यात अंतर्गत वादाचा भडका कसा निर्माण होईल हे काम पीएफआय करत होती, असंही देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलं आहे. केरळ सरकारने सर्वात अगोदर पीएफआय वर बंदी घालण्याची मागणी केली. त्यानंतर वेगवेगळ्या राज्याने सुद्धा याबाबत केंद्र सरकारशी पाठपुरावा केला. उत्तर पूर्वेला मशिदी तोडल्याप्रकरणी मध्यंतरी फार मोठा भडका अमरावतीमध्ये उडाला होता. त्याचे पडसाद आपण सर्वांनी बघितले. वास्तविक याचा अमरावतीशी काही संबंध नव्हता. इतर देशातील त्याचबरोबर बांगलादेशचा त्याचा समावेश होता. तेच पीएफआय करत आहे. सध्या पीएफआय वर बंदी घातल्यानंतर त्यांचा फायनान्स मॉडेल काय आहे, कशा पद्धतीचे त्यांनी अकाउंट तयार केले आहेत, या सर्व गोष्टींचे पुरावे आता हाती लागतील. बंदी बाबत प्रत्येक राज्याने कारवाई करायची आहे. त्याचबरोबर पीएफआय शी संबंधित ६ संघटनांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.