महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitesh Rane On Disha Salian : पोलिसांच्या नोटिसीनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'दिशाला न्याय मिळावा...'

दिशा सालियनचा ( Disha Salian Case ) लैंगिक अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आल्याचे नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना नोटीस बजावली होती. त्यावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ( After Notice Malvani Police Nitesh Rane ) आहे.

Nitesh Rane
Nitesh Rane

By

Published : Mar 2, 2022, 3:58 PM IST

Updated : Mar 2, 2022, 4:22 PM IST

मुंबई - दिशा सालियन मृत्यू ( Disha Salian Case ) प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) आणि आमदार नितेश राणेंनी ( Mla Nitesh Rane ) वक्तव्य केले होते. त्याप्रकरणी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनने चौकशीसाठी नारायण राणे आणि नितेश राणे यांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली ( After Notice Malvani Police Nitesh Rane ) आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, आम्हाला आज पोलिसांची नोटीस मिळाली आहे. आम्ही त्यांना उत्तर देऊ. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत आम्ही न्यायालयात पुरावे सादर करु. तसेच, दिशाला न्याय मिळावा, अशी आमची इच्छा आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

दिशा सालियन वर लैंगिक अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली. तेव्हा ती गरोदर होती, असा दावा करुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणात अनेक लोक अडकल्याचा आरोप करत ते शिवसेनेवर निशाणा साधत होते. याबाबत सालियन कुटुंबियांनी नुकतीच महिला आयोगाकडे दाद मागितली होती. महिला आयोगाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा अहवालही मागवला होता. त्यानुसार तिच्यावर अत्याचार झाला नाही तसेच मृत्यूच्या वेळी ती गरोदर नव्हती, असे म्हटले आहे.

या पार्श्वभुमीवर सालियन कुटुंबियांनी राणे पिता पुत्रा विरोधात खोटे आरोप करुन आमची बदनामी करत असल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

हेही वाचा -Disha Salian Death Case : नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ, मालवणी पोलिसांचं समन्स, नितेश राणेंचाही जबाब नोंदवणार

Last Updated : Mar 2, 2022, 4:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details