मुंबईमागील दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधामुळे सण उत्सवावर बंदी होती. ( Navratri Festival ) परंतु यंदा हे सण उत्सव खुल्या वातावरणात व निर्बंध मुक्त होत असल्या कारणाने आता गणेश उत्सवानंतर भक्तगणांना वेध लागले आहे, ते नवरात्री उत्सवाचे. ( Navratri Festival 2022 ) यासाठी मुंबईतील देवींच्या मूर्ती कारखान्यात मुर्त्या साकारायला सुरुवात झाली आहे. महागाई प्रचंड वाढ झाली असली. ( Navratri Festival In Mumbai ) मुर्त्यांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वधारल्या असल्या तरी, सुद्धा यंदा मुर्त्यांची मागणी ही मोठ्या प्रमाणात आहे.
गणेश उत्सवापाठोपाठ आता लगबग नवरात्रोउत्सवाचीशिंदे फडणवीस सरकारने उत्सवांवरील सर्व निर्बंध उठवल्याने धूम धड्याक्यात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवानंतर आता सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. ९ सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे. यादिवशी ११ दिवसाच्या बाप्पांना निरोप दिला आहे. त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील मूर्तिकार सज्ज झाले आहेत. मुंबईतील विविध मूर्ती कारखान्यात देवीच्या मुर्त्या साकारायला सुरुवात झाली आहे.
मुर्त्यांचे दर वाढले? अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवासाठी मूर्तीकारांनी आदिशक्तीच्या मूर्ती निर्मितीच्या कामाला वेग दिला आहे. गणराया प्रमाणेच यंदा आदिशक्तीच्या मूर्तींचे दरही वीस ते तीस टक्क्यांनी वधारले आहेत. मुंबईत यंदा नवरात्र उत्सवाला प्रचंड जोर धरणार आहे. कारण कोरोनाच्या सावटा नंतर पहिल्यांदा नवरात्र उत्सव हा गणेशोत्सवाप्रमाणे धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. यासाठी मुंबईतील देवींच्या मूर्ती कारखान्यात कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नवरात्रीत देवींच्या विविध रूपातील मुर्त्या साकारल्या जातात. त्यांची उंची जास्तीत जास्त १४ फुटापर्यंत असते.
या मुर्तिकारांना गणेशोत्सवानंतर फार कमी अवधीत देवीच्या मूर्ती घडवायच्या असतात. देवी हे स्त्री रुप असल्याने डोळे, चेहरा, हास्य आदी कामे फार बारकाईने करावी लागतात, अशी माहिती अरुण दत्ते मूर्तिकार कृष्णा आर्ट्स यांनी दिली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, नारळाच्या काथ्या, मजुरी आदींमध्ये वाढ झाल्याने यंदा मूर्तीचे भावही २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. यंदा नवरात्रोत्सव खुल्या मैदानात विना निर्बंध साजरा होत असल्याने देवीच्या मूर्तीची मागणीही वाढली आहे.
उत्तर भारतातील कारागीर मोठ्या प्रमाणात दरम्यान उत्तर प्रदेश, बिहार आदी भागातूनही कारागीर मुंबईतील विविध मूर्ती कारखान्यात देवींच्या विविध रुपी मुर्त्या साकारण्यात मग्न झाले आहेत. दीड फुटापासून ते चौदा फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती साकारल्या जात आहेत. तीन हजारापासून ते ८० हजार रुपयांपर्यंत त्याची किंमत असून, नवरात्रोत्सव मंडळाकडून बुकिंग सुरू झाली आहे, अशी माहिती कलासंग आर्ट्स चे मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी दिली.