मुंबई - उत्तर प्रदेशातील भाजपात गेल्या ( Uttar Pradesh Bjp ) पाच वर्षात मोठा अहंकार निर्माण झाला होता. या अहंकारामुळे लोकांना अपमानित केले जात होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्याचमुळे भाजपातून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर ( Up Minister Resigns ) पडत आहेत. हे सत्ता परिवर्तनाचे संकेत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik On Up Election ) यांनी व्यक्त केले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले की, "उत्तर प्रदेशमधील जनतेच्या मनात अस्वस्थता आहे. गेली पाच वर्ष ही जनता भयभित राहत होती. येथील भाजपात मोठा ( Uttar Pradesh Bjp ) अहंकार निर्माण झाला होता. या अहंकारामुळे लोकांना अपमानित केले जात होते. म्हणून उत्तर प्रदेश सरकार विरोधात प्रचंड ( Uttar Pradesh Bjp ) नाराजी होती. याच कारणाने भाजपातून लोक बाहेर पडत आहेत. येणाऱ्या काळात उत्तर प्रदेश भाजपात फूट पडेल. हे सत्ता परिवर्तानाचे संकेत आहे."