मुंबई - राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जावयावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांचा राजीनामा घेतला होता. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर ( CM Uddhav Thackeray Kin Shridhar Patankar ) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली ( Nitesh Rane On CM Resign ) आहे.
विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांना बोलताना नितेश राणे म्हणाले की, मनोहर जोशी यांना एक न्याय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेगळा न्याय का?. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. बनावट शेल कंपनीच्या माध्यमातून पैसै हवाला करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. है पैसे हवाला करण्यासाठी नंदकुमार चतुर्वेदी या व्यक्तीनी मदत केली आहे.