मुंबई: Shiv Sena Symbol Issue: शिवसेना कोणाची हा वाद (thackeray vs shinde) आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात असून कागदपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा संपल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिंदे (eknath shinde) गटाची धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईसाठी धावपळ उडाली आहे.
उद्या मुदत संपणार: मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची धामधूम सुरु असताना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाचं हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या कोर्टात प्रलंबित आहे. यासंदर्भात पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार ती मुदत उद्या संपणार आहे. दोन्ही गट आजच कागदपत्रे घेऊन दिल्लीत रवाना झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून आज वकिलांची भेट घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक आयोगाला काय उत्तर द्यायचे, आणखी कोणत्या प्रकारचे पुरावे सादर केले पाहिजेत याबाबत खल होऊ शकतो. तसेच या सगळ्या कायदेशीर लढाईसाठी आणखी काही अवधी देण्यात यावा अशी चर्चा देखील करण्यात आली.