महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lawyer Inderpal Singh in trouble : अनिल देशमुख यांच्यानंतर वकील इंद्रपाल सिंगही अडचणीत; अटकेची टांगती तलवार - Lawyer Inderpal Singh in trouble

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील असलेल्या इंद्रपाल सिंग  ( Anil Deshmukhs lawyer Inderpal Singh ) यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयाकडून ७ दिवसांची वेळ मागून घेतली आहे. इंद्रपाल सिंग हे उच्च न्यायालयात जाऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याने इंद्रपाल सिंह यांच्या ( woman allegation on Adv Inderpal Singh ) विरोधात चारकोप पोलीस ठाण्यात एफआयआर ( case against Adv Inderpal Singh ) दाखल केला होता.

इंद्रपाल सिंग
इंद्रपाल सिंग

By

Published : Jan 10, 2022, 5:15 PM IST

Updated : Jan 10, 2022, 5:31 PM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वकील इंद्रपाल सिंग यांनी अश्लील भाषा वापरल्याची एका महिलेने तक्रार केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील असलेल्या इंद्रपाल सिंग ( Anil Deshmukhs lawyer Inderpal Singh ) यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयाकडून ७ दिवसांची वेळ मागून घेतली आहे. इंद्रपाल सिंग हे उच्च न्यायालयात जाऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याने इंद्रपाल सिंह यांच्या विरोधात चारकोप पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले होते की, देशमुख यांचे वकील इंद्रपाल यांनी तक्रारदार महिलेला व्हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील भाषा वापरली. त्यांनी भेटीदरम्यान धक्काबुक्कीही केली.

हेही वाचा-Anil Deshmukh in Jail : अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील वाढला मुक्काम; पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार

चारकोप पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप

पोलिसांनी तक्रारीनंतर सुमारे २ महिने उलटूनही गुन्हा दाखल केला होता. परंतु कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चारकोप पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आलेला आहे. इंद्रपाल सिंग यांच्यासह ३ आरोपींनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला ( Adv Inderpal Singh bail petition ) होता. पीडितेच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी इंद्रपाल सिंग आणि त्याच्या इतर साथीदारांचा जामीन अर्ज फेटाळला.

हेही वाचा-Katol To Nagpur Road : गडकरींनी मानले माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे आभार

न्यायालयाने तक्रारदाराची बाजू गांभीर्याने ऐकून घेतली आहे. चारकोप पोलिसांना तपास करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जामीन रद्द केल्याचे पीडितेच्या वकिलांचे म्हणणे आहे.

काय आहे पीडितेचा आरोप-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने चारित्र्यहनन आणि विनयशीलतेबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे आणि महिला आयोगाकडे न्याय मागितला आहे. अॅड. इंद्रपाल सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विनयभंग करत व्हाट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

Last Updated : Jan 10, 2022, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details