महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLA Ravi Rana : 13 दिवसानंतर रवी राणांची जेलमधून सुटका; घरी जाताना गाडीत हनुमान चालीसा पठण - सुटकेनंतर रवी राणांची गाडीत हनुमान चालीसा पठण

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा ( MLA Ravi Rana and MP Navneet Rana ) हे गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये होते. हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) पठणावरून पेटलेला वाद त्यांना जेलवारीपर्यंत घेऊन गेला. त्यानंतर काल नवनीत राणा जेलमधून बाहेर आल्या. तर आज आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) जेलमधून बाहेर आले. मात्र 13 दिवस जेलमध्ये राहून बाहेर पडलेल्या रवी राणांच्या हातात हनुमान चालीसा दिसून आले.

रवी राणा जेलमधून सुटका
रवी राणा जेलमधून सुटका

By

Published : May 5, 2022, 5:07 PM IST

Updated : May 5, 2022, 5:26 PM IST

मुंबई -आमदार रवीराणा आज (गुरुवारी) १३ दिवसांनंतर तळोजा ( Ravi Rana Released From Taloja Jail ) तुरुंगातून बाहेर आले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते लीलीवती रुग्णालयात ( Lilivati ​​Hospital ) जाणार असल्याची माहिती आहे. मानेच्या दुखण्यामुळे खासदार नवनीत राणांना ( MP Navneet Rana ) लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रवी राणा हे देखील थेट लीलावतीत जाणार आहे. हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) पठणावरून पेटलेला वाद त्यांना जेलवारीपर्यंत घेऊन गेला. त्यानंतर नवनीत राणा जेलमधून बाहेर( MLA Ravi Rana released from jail ) आल्या. तर आज आमदार रवी राणा जेलमधून बाहेर आले. 13 दिवस जेलमध्ये राहून बाहेर पडलेल्या रवी राणांच्या हातात हनुमान चालीसा दिसून आले.

जेलमधून सुटल्यानंतर रवी राणा हनुमान चालीसा पुस्तक दाखविताना

नेमकं प्रकरण काय? -सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरुन राजकारण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

हेही वाचा -Rana Couple : नवनीत राणांची अखेर सुटका; तपासणीसाठी लीलावती रूग्णालयात दाखल

Last Updated : May 5, 2022, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details