महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Afghan-Taliban issue - महाराष्ट्रातील अफगाणी विद्यार्थ्यांनी घेतली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट - अफगाण तालिबान प्रश्न

अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीमुळे अफरातफरी माजली आहे. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर सामान्य नागरिकही दहशतीने देश सोडून जात आहेत. विमानाच्या पंख्यावर बसून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची सुरु असलेली जीवघेणी धडपड पहायला मिळत आहे. त्यात नातेवाईकांच्या चिंतेने जगभरातील अफगाण नागरिक अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अफगाणिस्तानी विद्यार्थ्यांनी मंगळवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या आहेत.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

By

Published : Aug 17, 2021, 7:10 PM IST

मुंबई - अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणमधील विद्यार्थ्यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज भेट घेऊन समस्या आणि व्यथा मांडल्या. तेथील परिस्थिती भयानक आहे. मात्र, महाराष्ट्रातील विद्यार्थी येथे सुरक्षित असल्याचे मंत्री ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

'आमचे संरक्षण करा'

अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीमुळे अफरातफरी माजली आहे. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर सामान्य नागरिकही दहशतीने देश सोडून जात आहेत. विमानाच्या पंख्यावर बसून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची सुरु असलेली जीवघेणी धडपड पहायला मिळत आहे. त्यात नातेवाईकांच्या चिंतेने जगभरातील अफगाण नागरिक अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रातील अफगाणिस्तानी विद्यार्थ्यांनी मंगळवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या आहेत. तसेच, भारत आमचा मोठा भाऊ असून, आमचे संरक्षण करावे, अशी विनंती या विद्यार्थ्यांनी केली आहे. सात मुले आणि चार मुलींसह एकूण अकरा विद्यार्थी यावेली अदित्य ठाकरे यांना भेटले. ही बैठक आज दुपारी तीनच्या सुमारास झाली. मुंबई विद्यापीठात शिकणारे अफगाणिस्तानचे विद्यार्थीही यामध्ये सामील झाले होते.

'केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार'

महाराष्ट्रातील अफगाणिस्तानी विद्यार्थ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ते त्यांच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यास सक्षम नाहीत. त्यांचा भारतातील व्हिसा संपत आला आहे. जवळपासचे पैसेही संपले आहेत. महाराष्ट्र सरकारने अशा परिस्थितीत त्यांना मदत करायला हवी, अस अदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच, भविष्यात ते अफगाणमध्ये गेल्यास पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे आपण या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच, सर्व अफगाण विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details