महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Actress Jiah Khan Suicide Case अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात आरोपी सुरज पांचोलीचे सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र - Affidavit of Suraj Pancholi in Session Court

बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हत्येप्रकरणी Jiah Khan suicide case विशेष सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामध्ये सुरज पांचोलीने प्रतिज्ञापत्र दाखल Affidavit of Suraj Pancholi Accused केले आहे. पांचोलीने जियाची आई राबिया खानने केलेल्या आरोपांचे खंडन केले असून त्यास विरोध केला आहे. खटल्याचा निकाल हा अंतिम टप्प्यात असताना अशी याचिका करण्यात आली असल्याचे देखील प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. Actress Jiah Khan Suicide Case

Actress Jiah Khan
अभिनेत्री जिया खान

By

Published : Aug 28, 2022, 10:01 AM IST

मुंबईबॉलीवूड अभिनेत्री जिया खान हत्येप्रकरणी Jiah Khan suicide case विशेष सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामध्ये सुरज पांचोलीने Suraj Pancholi in Sessions Court प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. पांचोलीने जियाची आई राबिया खानने केलेल्या आरोपांचे खंडन केले असून त्यास विरोध केला आहे. खटल्याला उशीर होण्यासाठी निराधार याचिका दाखल करण्यात आली आहे. खटल्याचा निकाल हा अंतिम टप्प्यात असताना अशी याचिका करण्यात आली असल्याचे देखील प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.



2013 मध्ये अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत जियाचा कथित प्रियकर म्हणून अभिनेता सुरज पांचोलीला अटक केली होती. सध्या सुरज जामीनावर आहे. विशेष एसआयटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी जियाच्या आईच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयात विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्यासमोर या प्रकरणात जियाची आई राबियाची साक्ष नोंदवण्यात आली असून त्यावर सुरज पांचोलीच्यावतीने अँड. प्रशांत पाटील यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.




राबिया खान यांनी जे. शेखर अँड कंपनीच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तिच्या मृत्यूप्रकरणी अधिक तपास करण्याची तिची याचिका फेटाळण्याच्या विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. खान यांनी सीबीआयच्या भूमिकेला विरोध केला असून त्यांच्या मुलीचा मृत्यू आत्महत्येने झाला नाही.



पंचोलीच्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटलेAffidavit of Suraj Pancholi Accusedआहे की, न्यायालयाने 30 जानेवारी 2020 रोजी पांचोलीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. आतापर्यंत फक्त 16 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. राबियांचा जबाब संपला असून त्याची उलटतपासणी सुरू आहे. अशा वेळी जर राबिया यांच्या याचिकेला परवानगी दिल्यास आपल्यावर अन्याय होईल अशी निराधार याचिका दाखल करून खटला लांबविण्याचा राबियांचा मानस असल्याचा दावाही प्रतिज्ञापत्रात केला आहे. 2016 मध्येही राबियाने अशीच मागणी केली होती त्याला सीबीआयने विरोध केला होता. सध्या या प्रकरणावर तपास सुरू आहे. यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी वाढीव वेळ द्यावा, अशी मागणी सीबीआयच्यावतीने अँड. संदेश पाटील यांनी न्यायालयाकडे केली. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.



काय आहे प्रकरणअभिनेत्री जिया खान हिचे निधन झाले तेव्हा ती अवघी 25 वर्षांची होती. जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने म्हटले होते की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. जियाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीचा प्रियकर आणि अभिनेता सूरज पांचोलीला आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे करण्यात आले होता.



10 जून 2013 रोजी सूरजला या प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्यानंतर जुलैमध्ये त्याला जामीन मिळाला. सूरजवर अजूनही कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करण्याअंतर्गत खटला सुरू आहे. Actress Jiah Khan Suicide Case

हेही वाचासलमान ऑस्ट्रियातून परतला, रितेश-जेनेलिया लंच डेटवर झाले कॅमेऱ्यात कैद

ABOUT THE AUTHOR

...view details