मुंबई- समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे ( Sameer Wankhede Father Dnyandev Wankhede ) यांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर मानहानीची याचिका (Defamation petition on Nawab Malik ) दाखल केली आहे. या याचिकेवर नवाब मलिक यांनी काल गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) 95 पानाचं प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. ( Nawab Malik Submitted Affidavit ) त्यात त्यांनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर अनेक आरोप केले.
प्रतिज्ञापत्र सादर -
समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतेही विधान करणार नसल्याची हमी उच्च न्यायालयात देऊनही नवाब मलिक वानखेडे यांच्या कुटुंबीयांविरोधात विधाने करतच असल्याचा दावा केला. त्यामुळे मलिक यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याचे नमूद करत ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उत्तर देताना मलिक यांनी ९५ पानांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. न्यायालयाची दिशाभूल करून आणि अनुकूल आदेश मिळवून आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासाठी आणि विशेषत: वानखेडे यांनी केलेल्या बेकायदेशीर गोष्टी उघड करण्यापासून मला रोखण्याच्या हेतूने खटला दाखल केला असल्याचे मलिक यांनी उत्तरात म्हटले आहे. वानखेडे पिता-पुत्रांनी केलेल्या बेकायदेशीर गोष्टी दडपण्यासाठी चुकीच्या हेतूने हा खटला दाखल करण्यात आला आहे. जे मलिक यांनी मिळवलेल्या आणि सादर केलेल्या पुराव्यांवरून समोर आले आहे.