महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

निसर्ग चक्रीवादळाचा रेल्वे, विमानसेवेला 'फटका'; 'असा' झाला परिणाम . . . . - लेटेस्ट न्यूज इन मुंबई

निसर्ग चक्रीवादळाने रेल्वे आणि विमानसेवेवर परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अगोदरच देशातील विमानसेवा आणि रेल्वेसेवा खंडीत करण्यात आली होती. मात्र १ जूनपासून सरकारने काही विशेष रेल्वे आणि विमानसेवा सुरू केली होती. त्यालाही निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे.

Mumbai
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 3, 2020, 2:02 AM IST

Updated : Jun 3, 2020, 2:24 AM IST

मुंबई- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबईतही धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वादळी पाऊसाची शक्यता वर्तवली जात आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवातही झाली आहे. त्याचा परिणाम रेल्वे आणि विमानसेवेलाही बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची विमाने आणि रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

'या' विमानसेवेवर झाला परिणाम

निसर्ग वादळामुळे इंडीगो विमान कंपनीने आपल्या १७ फ्लाईट रद्द केल्या आहेत. इंडीगो विमान कंपनी फक्त फ्लाईट उद्या मुंबईतून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन फक्त १२ फ्लाईट येणार आहेत. यात एअर एशीया इंडीया, एअर इंडीया, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

रेल्वे सेवेवरही झाला परिणाम

कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेसेवा खंडीत करण्यात आली होती. मात्र कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी विशेष रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वेने काही विशेष रेल्वे सोडण्याचे निश्चित केले आहे. या विशेष रेल्वेवरही निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ५ विशेष रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तर मुंबईत येणाऱ्या ३ रेल्वे गाड्या वळवण्यात आल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्नसच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या विशेष गाड्यांमध्ये गोरखपूर विशेष रेल्वे, तिरुअनंतपूर विशेष रेल्वे, दरभंगा विशेष रेल्वे, वाराणसी विशेष रेल्वे, उत्तरप्रदेश विशेष रेल्वे, पटना विशेष रेल्वे, वाराणसी विशेष रेल्वे, तिरुअनंतपूरम विशेष रेल्वेचा समावेश आहे. त्यामुळे या विशेष रेल्वेने मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून परराज्यात जाणाऱ्या नागरिकांनाही निसर्ग वादळाचा चांगलाच फटका बसला आहे.

Last Updated : Jun 3, 2020, 2:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details