मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. त्यानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याना आज सोमवार (दि. 11 एप्रिल)रोजी गिरगांव कोर्टात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टासमोर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दंडाधिकारी न्यायालयापुढे हजर केलं जाणार - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी रात्री त्यांना उशिरा गावदेवी पोलिसांना ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर इतर 109 आरोपी एसटी कामगारांना न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली होती. आज गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपणार असून त्यांना पुन्हा आज त्यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे.
चप्पलफेक करत गोंधळ घातला - मागील 5 महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्य शासनात विलिनीकरणासाठी आंदोलन करत आहेत. शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे.